Jawan Film Actress Priyamani On Intimate Scenes Instagram
मनोरंजन बातम्या

Priyamani On Intimate Scenes: ‘माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ?’ म्हणत अभिनेत्रीने इंटिमेट सीन्सबद्दल सोडले मौन

Priyamani Interview: अभिनेत्रीने मुलाखतीत चित्रपटातील इंटिमेट सीन आणि ऑनस्क्रीन किसिंग सीनवर भाष्य केलंय.

Chetan Bodke

Priyamani New Film: दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री लवकरच शाहरूख खान मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘जवान’मध्ये देखील ती दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या अभिनेत्रीने दिलेली एक मुलाखतीत बरीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने मुलाखतीत चित्रपटातील इंटिमेट सीन आणि ऑनस्क्रीन किसिंग सीनवर भाष्य केलंय.

प्रियामणी गेल्या दोन दशकापासून ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने प्रेक्षकांना अनेक हिट चित्रपट दिले असून अभिनेत्रीने ऑनस्क्रीन किसिंग किंवा इंटिमेट सीन्स दिलेले नाहीत. ती या सीन्सपासून दूर राहते. नुकताच तिने दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटामध्ये किसींग किंवा इंटिमेट सीन्स न देण्यामागील कारण सांगितले. प्रियामणी म्हणते, मी यामध्ये कम्फर्टेबल नाही आणि कधीही ऑनस्क्रीन किस करणार नाही. अभिनेत्रीला याविषयी तिच्या पतीला उत्तर द्यावे लागेल. म्हणून ती ऑनस्क्रिन इंटिमेट सीन करत नाही.

परपुरूषासोबत इंटिमेन सीन्ससाठी कन्फर्टेबल नाही

रूपेरी पडद्यावर किसींग करणे किंवा न करणे ही तिची वैयक्तिक निवड असल्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या प्रियामणीने सांगितले. ‘News 18’ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, माझ्या चित्रपटांमध्ये किसींग फक्त जास्तीत जास्त गालावरच असतं.

तर पुढे ‘नो किसींग’ पॉलिसीबद्दल प्रियामणी म्हणते, “मी ऑनस्क्रीन किस करणार नाही, या माझ्या विचारावर मी ठाम आहे. मला माहित आहे की, ती फक्त माझी भूमिका आहे आणि ते माझे काम आहे.परंतु वैयक्तिकरित्या बोलायचे तर, मला ऑनस्क्रीन परपुरूषासोबत किस करण्यात मी कन्फर्टेबल नाही, कारण की, त्या विषयी मला माझ्या पतीला उत्तरं द्यावे लागतील.”

इंटिमेट सीन्समुळे अनेक प्रोजेक्टला नकार

प्रियामणीने २३ ऑगस्ट २०१७ रोजी एका खाजगी समारंभात मुस्तफा राजसोबत लग्न केले आहे. ‘हिज स्टोरी’ या शोमध्ये प्रियामणीला अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत एक इंटिमेट सीन करायचा होता. पण प्रियामणी त्याच्यासोबत तो सीन करण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती. प्रियामणीने मुलाखतीत म्हणाली, “जास्तीत जास्त मी गालावर किस देऊ शकते, त्याहून अधिक मला जमणार नाही. माझ्याकडे इंटिमेट सीन्स असलेले अनेक प्रोजेक्ट्स आले होते. त्यात असे अनेक सीन्स होते की, ते करण्यासाठी मी कम्फर्टेबल नव्हते, मी त्यांना त्या सीन्ससाठी कम्फर्टेबल नसल्याचं सांगितलं.”

माझी प्रतिमा

सोबतच आपल्या मुलाखतीत ती म्हणते, “जेव्हा तो प्रोजेक्ट माझा प्रेक्षकांसमोर येईल, त्यावेळी माझ्या सासरचेही आणि माहेरचेही हा चित्रपट पाहतात. त्यांना माहित आहे की, माझं हे काम आहे, पण त्यांच्या समोर मला माझी प्रतिमा मलिन नाही करायची.सासरच्या लोकांनी असा विचार करायला नको की, आपली सून लग्नानंतही हे काय करत आहे. तिच्यावर परपुरूष येऊन हात का ठेवतोय? ते लोक काही बोलणार नाहीत, पण ते माझं खासगी आयुष्य आहे. म्हणून मी इंटिमेट सीन्ससाठी नकार देते.”

अभिनेत्रीची सिनेरकारकिर्द

प्रियामणीने २००३ मध्ये Evare Atagaadu या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दिला सुरूवात केली. परंतु २०१७ मध्ये आलेल्या Paruthiveeran या चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. अभिनेत्री टॉलिवूड चित्रपटांसोबतच रावण, रक्तचरित्र 2 , चेन्नई एक्सप्रेस, अतीत आणि सलाम वेंकी या बॉलिवूड चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या समोर आली. गेल्या काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमध्ये देखील अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारली होती, तिला या वेबसीरिजमधूनही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. लवकरच ती अजय देवगणसोबत ‘मैदान’ आणि शाहरुख खान सोबत ‘जवान’ या चित्रपटात झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

SCROLL FOR NEXT