Chandrachur Singh Life Story: एका अपघातानं आयुष्यच बदललं, ऐश्वर्यासोबत हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याचं कसं संपलं करियर?

Chandrachur Singh News: नुकताच अभिनेता आणि त्याचा मुलगा विमानतळावर एकत्र स्पॉट झाला आहे.
Chandrachur Singh Life Story
Chandrachur Singh Life StorySaam Tv
Published On

Bollywood Actor Chandrachur Singh: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते चंद्रचुड सिंहने स्वत:ला काही काळानंतर त्याने स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर केलं. चंद्रचुड शेवटचे २०२२ मध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेल्या कठपुतलीमध्ये तो होता. यावेळी चंद्रचुड एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. नुकताच अभिनेता आणि त्याचा मुलगा विमानतळावर एकत्र स्पॉट झाला आहे.

Chandrachur Singh Life Story
Bigg Boss OTT 2 Update : मी गे आहे, आकांक्षा पुरीला किस केल्यानंतर पूजा भट्टच्या संतप्त प्रश्नावर जदचं विचित्र उत्तर

मुलगा श्रवणजय सिंह हा अभिनेत्यासारखा दिसत असल्याने त्याला अभिनेत्यासारखीच कार्बन कॉपी असल्याचंच म्हटलं आहे. सध्या या वडील- मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून अभिनेता चर्चेत आला आहे. यावेळी अभिनेता चंद्रचुड सिंहचा लूक फारच चर्चेत आला आहे. दोघांनाही एकाच लूकमध्ये पाहून प्रेक्षकांनी वडिलांचा कार्बन कॉपी असल्याचं म्हटलं आहे, सध्या हा व्हिडीओ वडील- मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्याच्या फिल्मी कारकिर्दिबद्दल बोलायचे तर, चंद्रचुडला लहानपणापासूनच संगीत आणि अभिनयाची आवड होती. त्याने गाण्याचेही प्रशिक्षण घेतले होते. सोबतच ‘आवरगी’या चित्रपटात तिने सहाय्यक दिग्दर्शकाचे देखील काम केले आहे, त्यानंतर ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून चंद्रचुडने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या या पहिल्या चित्रपटाला चांगले यश मिळाले नाही. पण करिअरमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने अनेक चित्रपट केले.

Chandrachur Singh Life Story
Saisha Bhoir Parents News: पूजा भोईरच्या अडचणी वाढल्या; वडील फरार, साईशाचीही पोलीस चौकशी होणार?

‘माचिस’मध्ये चंद्रचुडने तब्बूसोबत एकत्र काम करत प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर चंद्रचुडने ‘दाग: द फायर’, ‘क्या कहना’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. ज्यावेळी चंद्रचुड आपल्या कारकिर्दीच्या यशाच्या शिखरावर होता, त्याचवेळी त्याचा गोव्यात स्कीइंग करताना अपघात झाला. त्याच अपघातात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर चंद्रचुडला आजारपणामुळे अनेक प्रकल्प सोडावे लागले.

जवळपास १० वर्ष कोणतेही ते काम करू शकत नव्हता. पुढे अभिनेत्याची पत्नी अवंतिका कुमारीचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर त्याने आपल्या लेकाचा एकट्यानेच सांभाळ केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com