Do Aur Do Pyaar Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

लव्ह, अफेयर अन् कन्फ्यूजन, Do Aur Do Pyaar चा Trailer Out; दिसणार विद्या- प्रतीकची भन्नाट केमिस्ट्री

Do Aur Do Pyaar Trailer: विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती यांची धम्माल केमिस्ट्री असलेला 'दो और दो प्यार'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे.

Chetan Bodke

Do Aur Do Pyaar Trailer Out

वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट सध्या बॉलिवूडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची लेडी सुपरस्टार विद्या बालनचा येत्या १९ एप्रिलला ‘दो और दो प्यार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना एक हटके लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. (Bollywood)

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर टीझर रिलीज झाला होता. टीझरला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर चाहत्यांच्या भेटीला चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती यांची धम्माल केमिस्ट्री असलेला 'दो और दो प्यार'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे. (Bollywood Film)

ट्रेलरच्या सुरूवातीला भांडण आणि नंतर, धम्माल मस्ती असं आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहे. ‘दो और दो प्यार’ चित्रपटामध्ये विद्या बालन आणि प्रतीक गांधी प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये विद्या आणि प्रतीक विवाहित जोडपं आहे. पण दोघांचेही आपआपसात भांडणं होताना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच, दोघांचंही बाहेर एका व्यक्तीसोबत अफेयर सुरू होतं. दोघेही ही गोष्ट एकमेकांपासून कशाप्रकारे लपवतात?, दोघांनाही दोघांचंही अफेयर कळलं तर? असे अनेक प्रश्न आपल्याला ट्रेलरमध्ये पाहिल्यावर पडतील. (Bollywood Actor)

या मॉडर्न रिलेशनशिपमध्ये, विद्या बालन सेंधिलच्या प्रेमात, तर इलियाना प्रतीक गांधीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. लव्ह आणि कॉमेडी असं कथानक असलेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळते. विद्याचे चित्रपटात काव्या नावाचे पात्र असून ती पेशाने डेंटिस्ट आहे, तर प्रतीक गांधी चित्रपटात अनीची भूमिका साकारत आहे. सेंथिल राममूर्ती विक्रम तर इलियाना डिक्रूझ नोरा नावाचे पात्र साकारले आहे. (Bollywood Actress)

अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत 'दो और दो प्यार', एक एलिपसिस एंटरटेनमेंट प्रोडक्शन, प्रेम, हशा आणि आधुनिक नातेसंबंधांची चमकदार कथा असणार आहे. 'दो और दो प्यार' हा चित्रपट निर्माता श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट येत्या १९ एप्रिल २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'द लव्हर्स' या परदेशी चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर भाष्य करण्यात आले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT