Crew Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Crew 2nd Day Collection: करीना-क्रिती आणि तब्बूच्या 'क्रू' सुस्साट, सलग दुसऱ्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

Crew Box Office Collection: ‘क्रू’ चित्रपटाला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Chetan Bodke

Crew 2nd Day Box Office Collection

करीना कपूर खान, क्रिती सेनन आणि तब्बू यांचा ‘क्रू’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर २९ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तिघींनीही या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून जोरदार धुमाकूळ घातला आहे. (Bollywood)

‘क्रू’ चित्रपटाला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने दमदार कमाई केलेली आहे. नुकतंच चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे. जाणून घेऊया दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल (Bollywood Film)

पोस्टर, टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता तर खूपच होती. थिएटरमध्ये चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. ‘सॅकनिल्क’ च्या वृत्तानुसार, ‘क्रू’ने पहिल्या दिवशी भारतात ९.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने २०.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतामध्ये, ९.६० कोटींची कमाई केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने जगभरामध्ये १० कोटींची कमाई केलेली आहे. (Bollywood News)

'क्रू' चित्रपटाचे कथानक, एका दिवाळखोर विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन एअर होस्टेसचे कथानक आहे. तिघेही आपापल्या आयुष्यातील समस्यांमध्ये अडकले आहेत. विमान कंपनीमध्ये काम करूनही पगार मिळत नाही. त्या तिघीही जेव्हा चुकीचं काम करतात, त्यावेळी कथेमध्ये एक वेगळाच ट्वीस्ट येतो. त्या तिघीही काय चुकीचं काम करतात?, ते काम केल्याने त्यांच्या अडचणीत कशी वाढ होते? हे सगळं चित्रपट पाहिल्यावरंच कळतं. (Bollywood Actress)

तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त चित्रपटामध्ये, दिलजीत दोसांझ, कॉमेडियन कपिल शर्मा, सास्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा यांचाही समावेश आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT