Animal Film Success Party See Video Instagram
मनोरंजन बातम्या

Animal Film Success Party: ‘ॲनिमल’ची सक्सेस पार्टी दणक्यात; सेलिब्रिटींनी स्टायलिश अंदाजात लावली हजेरी

Animal Film: नुकतंच रणबीर आणि रश्मिका स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती.

Chetan Bodke

Animal Film Success Party See Video

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. या चित्रपटाने एका महिन्यातच बॉक्स ऑफिसवर जगभरात ८८६ कोटींहून अधिकचं कलेक्शन केलं आहे. पण एकीकडे या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत असताना दुसरीकडे यावर टीकाही होत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. (Bollywood Film)

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत रणबीर कपूर आणि आलिया भट्टने फुल्ल स्टायलिश स्टाईल अंदाजामध्ये हजेरी लावली होती. सक्सेस पार्टी दरम्यान, ग्रे सूट आणि ब्लॅक कोटमध्ये रणबीर खूपच सुंदर दिसत होता. तर, आलिया भट्ट रॉयल ब्लू कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. (Bollywood Actor)

यावेळी त्यांच्यासोबत रणबीर कपूरची आई नीतू सिंग, आलियाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. नीतू सिंगच्याही स्टायलिश लूकने नेटकऱ्यांचं मन वेधलं. या चौघांनीही पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर स्टायलिश अंदाजामध्ये पोझ देत हटके फोटोशूट केलं. (Bollywood Actress)

बॉबी देओलने खलनायकाचे पात्र साकारले. चित्रपटामध्ये तो मुक खलनायक म्हणून दिसत असून त्याने ही सक्सेस पार्टीमध्ये खूपच स्टायलिश अंदाजामध्ये एन्ट्री घेतली. सोबतच रणविजयच्या वडीलांचे पात्र साकारणाऱ्या अनिल कपूर यांनीही खूप दणक्यात सक्सेस पार्टीमध्ये एन्ट्री केली. यावेळी दोघांचेही फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींनी एकच गर्दी केली होती. सध्या ह्या सक्सेस पार्टीचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Social Media)

दमदार ॲक्शन, उत्तम कथा, अफलातून व्हिएफएक्स आणि कलाकारांचा अभिनय असा मिलाप असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसते. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT