Remo D'Souza Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Remo D'Souza Birthday: वडिलांचा इच्छा होती पायलट व्हावं, मात्र रेमो डिसुझाने पाय जमिनीवर ठेवत घेतली गगन भरारी

Remo D'Souza: आपल्या डान्स मुव्हजने फक्त सेलिब्रिटींनाच नाही तर चाहत्यांनाही वेड लावणारा कोरियोग्राफर म्हणजे रेमो डिसुझा

Chetan Bodke

Remo D'Souza Birthday

आपल्या डान्स मुव्हजने फक्त सेलिब्रिटींनाच नाही तर चाहत्यांनाही वेड लावणारा कोरियोग्राफर म्हणजे रेमो डिसुझा (Remo D’Souza). मोठमोठ्या कलाकारांना आपल्या तालावर त्याने नाचवले आहे. त्याच्या डान्सचे आज लाखो चाहते आहेत. रेमो हा एक अष्टपैलू कलाकार आहे. त्याने फक्त डान्सची कोरिओग्राफी नाही तर, अभिनय आणि चित्रपटांचेही त्याने दिग्दर्शन केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत नशीब आजमावत त्याने तिन्ही क्षत्रात आपलं कौशल्य सिद्ध केलं. रेमो डिसुझाचा आज ४८ वा वाढदिवस आहे. २ एप्रिल १९७४ रोजी त्याचा जन्म झालेला आहे. (Bollywood)

रेमो डिसुझाला बालपणापासूनच डान्सिंगची आवड होती. पण त्याची आवड त्याच्या परिवाराला आवडत नव्हती. त्याच्या डान्सिंग करियरला वडिलांचा विरोध होता. त्याचे वडिल त्याला कायमच पायलट बनण्याचा आग्रह करायचे, पण त्याने वडिलांच्या बोलण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. पण रेमोने डान्सिंग क्षेत्रातच करियर केले. रेमो डिसुझाचं खरं नाव रमेश यादव असं आहे. रेमोने आपल्या करियरच्या सुरूवातीच्या दिवसांत रेल्वे स्टेशनवर झोपून, उपाशी पोटी झोपून दिवस काढले आहेत. तो जामनगर हून मुंबईमध्ये आल्यानंतर आपलं नाव बदलले आहे.

रेमोला त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक नकारांना सामोरे जावे लागले. त्यामुळे तो खूपच डिप्रेशनमध्ये गेला होता. पण त्याने कधीच हार मानली नाही. रेमोने पहिल्यांदा कोरिओग्राफर अहमद खान यांच्याकडे कामासाठी गेला होता. तिथे ऑडिशनच्या आधी त्याने त्याच्या लूकच्या आधारावर न निवडता त्याच्यातील स्किलच्या आधारे निवड करावी, अशी विनंती केली होती.

निवड झाल्यानंतर रेमोला अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत डान्स परफॉर्म करण्याची संधी मिळाली. त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यानंतर रेमोने मागे वळून पाहिले नाही. रेमोला पहिल्यांदाच ‘रंगीला’ चित्रपटामध्ये डान्स करण्याची संधी मिळाली होती. वेगवेगळ्या शोजच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली आहे.

रेमो अनेक तरूणांचा आवडता डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. त्याच्यासोबत काम करण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. त्याने अनेक डान्स रिॲलिटी शोचे परीक्षक म्हणून काम केले आहे. त्याने त्याच्या सिने करियरमध्ये 'ABCD', 'ABCD 2', 'फालतू', 'अ फ्लाइंग जट', 'स्ट्रीट डान्सर 3D' आणि 'रेस 3' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर अनेक लोकप्रिय गाण्यांची रेमोने कोरियोग्राफी केलेली आहे.

त्यामध्ये, बलम पिचकारी, पिंगा लावणी, सुन साथिया, डिस्को दिवाने, मोरे परदेसिया या गाण्यांचा समावेश केला जातो. डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस, डान्स चॅम्पियन, नच बलिये आणि झलक दिखला जा या टीव्ही शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहिले. 'बाजीराव मस्तानी'साठी रेमोला राष्ट्रीय पुरस्कार आणि 'कलंक'साठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT