Sonam Kapoor saam tv
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor : ४० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म

Sonam Kapoor Welcome Baby : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली.

वयाच्या ४० व्या वर्षी सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला.

सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनेत्रीने आनंदाची बातमी दिली आहे.

बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोनम दुसऱ्यांदा आई झाली आहे. सध्या कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

सोनम कपूरने 29 मार्चला मुलाला जन्म दिला. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 2018 ला लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पहिल्या मुलाचे वायू कपूर अहुजाचे स्वागत केले. सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे. तसेच ती आपल्या फिटनेसकडे देखील विशेष लक्ष देते. एक खास भावनिक पोस्ट करून सोनम कपूरने बाळाच्या स्वागताची बातमी चाहत्यांना दिली आहे.

सोनम कपूरची पोस्ट

"कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या मनाने आम्ही आमच्या बाळाच्या (मुलाच्या) आगमनाची गुडन्यूज देत आहोत. मी २९ मार्च २०२६ रोजी बाळाला जन्म दिला. आमच्या कुटुंब आता मोठे झाले आहे. 'वायु' (Dayu) आपल्या धाकट्या भावाचे स्वागत करण्यास अत्यंत उत्सुक आणि आनंदी आहे. बाळाच्या येण्याने आमचे घर सुख-समृद्धीने आणि चैतन्याने भरून गेले आहे. आम्ही धन्य आहोत. चार जणांचे कुटुंब म्हणून या सुंदर नव्या पर्वाची सुरुवात करता आहोत...सोनम, आनंद आणि वायु यांच्याकडून तुम्हाला खूप प्रेम..."

सोनम कपूरच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. त्यांनी नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. सोनम कपूरने 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आजवर सोनम कपूरने अनेक हिट चित्रपट केले आहेत. यात आयशा, रांझणा, आय हेट लव्ह स्टोरी, निर्जा, संजू अशा चित्रपटांची नावे आहेत. तिला अनेक चित्रपटांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT