बॅलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आहे. अभिनेता रणवीरचे राम लीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी, सिम्बा यांसारखे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील रणवीरच्या चित्रपटाला खूप पंसती मिळाली आहे. दमदार अभिनय असणाऱ्या रणवीर सिंगने बॅलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्याच्या अनोख्या शैलीने आणि उत्साही मनाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रणवीर नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहायला मिळत असतो. रणवीर सोशल मिडियावर देखील खूप चर्चेत असतो. सोशल मिडियावर रणवीर सिंग अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. पण बॅलिवूडचा दमदार अभिनय करणारा रणवीर किती कोटी संपत्तीचा मालक आहे, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. जाणून घेऊयात रणवीर सिंगची एकूण संपत्ती किती आहे.
बॅलिवूडमधील टॅाप स्टार म्हणून ओळखला जाणारा रणवीर एका चित्रपटासाठी ३० ते ५० कोटी रुपये घेतो. रणवीरच्या कमाईमध्ये ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय आणि स्टेज परफॅार्मन्सचा सर्वाधिक वाटा आहे. अभिनेता रणवीरची Pepsi,Chings,Bingo,Head And Shoulders यांसारख्या ब्रँड एंडोर्समेंटमध्ये गुंतवणूक आहे. रणवीर सिंगच्या अनेक ठिकाणी मालमत्ता देखील आहेत. अभिनेता रणवीरचे मुंबईच्या वरळी टॅार्वसमध्ये ४० कोटी रुपयांचे अलिशान घर आहे. त्याचबरोबर रणवीरचे प्रभादेवी परिसरात १६ कोटी रुपयांचे 4BHK घर आहे. रणवीर सिंगचे अलिबाग येथे देखील २२ कोटी रुपयांचा अलिशान बंगला आहे. रणवीर सोशल मिडिया प्रोमोशनसाठी १० लाख रुपये घेतो. अभिनेत्याची वार्षिक कमाई २१ कोटी रुपये आहे.
रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीरला लक्झरी लाइफस्टाइल, महागड्या गाड्या अन् वस्तूंचा प्रचंड शौक आहे. रणवीरच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडी, रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. रणवीर सिंगकडे ८० लाख रुपयांची डार्क नाइट-थीम असलेली व्हिॅनिटी व्हॅन आहे. त्याचबरोबर रणवीरकडे ३ कोटी रुपयांची रेंज रोव्हर, १ कोटी रुपयांची मर्सिडीज, १ कोटी रुपयांची जग्वार, ५ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी आणि ४ कोटी रुपयांची फेरारी आहे. रणवीरला घड्याळ्यांची फार आवड आहे. रणवीरकडे २.६ कोटी रुपयांचे सोन्याचे घड्याळ आहे. त्याचबरोबर रणवीरच्या वॅार्डरोबमध्ये १.४५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या लक्झरी वस्तूचां समावेश आहे. रणवीरच्या उत्तम यशामुळे तो आज २४५ कोटी रुपयांचा मालक आहे.