Malaika Arora canva
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: अर्जुन कपूरची एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोरा आहे कोट्यवधींची मालकीण; नेटवर्थ किती?

Malaika Arora Net Worth: मलायका अरोरा बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण बॅलिवूडची ही सुपर हॅाट गर्ल किती कोटी रुपये संपत्तीची मालकिण आहे, हे जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅलिवूडमध्ये मलायका अरोरा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका अरोरा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील मलायकाचे फिटनेस आणि लूकचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मलायका अरोराचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. याबरोबर मलायका बॅलिवूड चित्रपटांमध्ये फार कमी काम करताना पाहायला मिळाली आहे. पण या सुपर हॅाट मलायकाचे अनेक गाणे हिट ठरले. मलायकाने तिच्या सुपरहिट गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. पण ही सुपर हॅाट गर्ल किती कोटी रुपये संपत्तीची मालकिण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. जाणून घेऊया मलायका अरोराची एकूण संपत्ती.

अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्याही चित्रपटातील गाण्यांमध्ये काम करण्यासाठी १.५ कोटी रुपये घेते. तर रिअ‍ॅलटी शो मध्ये जज म्हणून काम करण्यासाठी प्रत्येक एपिसोड ६ ते ८ लाख रुपये मानधन घेते. याबरोबर मलायकाला फिटनेस आणि योगाची खूप आवड आहे. तिच्या कमाईमध्ये सर्वाधिक वाटा योगा आहे. मलायका योगा स्टुडिओमधून सर्वाधिक कमाई करत असते. याबरोबर मलायकाची अनेक ठिकाणी गुंतवणूक देखील आहे. मलायकाने SARVA YOGA या फिटनेस अॅपमध्ये गुंतवणूक केली आहे. मलायका ब्रँड एडोर्समेंटमधून देखील पैसे कमवत असते.

मलायका अरोराची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. तिचे मुंबईतील वांद्रे परिसरात अलिशानअपार्टमेंट आहे. तिच्या त्या अलिशान अपार्टमेंटची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. मलायका महिन्याला ७० लाख रुपये कमवते. अभिनेत्रीला महागड्या कार आणि लक्झरी वस्तूंची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. तिच्याकडे ३.२८ कोटी रुपयांची रेंज रोव्हर आहे. मलायकाकडे बीएम डब्लू ७ सीरीज आहे ज्याची किंमत १.४२ कोटी रुपयांची आहे. याबरोबर तिच्याकडे ऑडी क्यू ७ आणि टोयाटा इनोव्हा सिस्टा आहे. तिच्या ऑडी क्यू ७ ची किंमत ८३.३ आहे, तर टोयाटा इनोव्हा सिस्टाची किंमत १८.०९ ते २३.८३ लाख रुपयांपर्यत असेल. बॅलिवूडची ही सुपर हॅाट गर्ल ९८ कोटी रुपये संपत्तीची मालकिण आहे.

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT