Rakhi Sawant Driver Stole Her Expensive Car And Money Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Driver Stole Her Expensive Car And Money: राखी सावंतच्या घरी चोरी, जवळच्याच व्यक्तीने केला विश्वासघात

Rakhi Sawant Latest News: राखीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या कारने नाही तर रिक्षाने फिरत असल्याचे दिसत आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant Driver Stole Her Car Money Gold Phone: बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. सध्या राखी वाढत्या महागाईमुळे तर चर्चेत होतीच, पण पुन्हा एकदा ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. राखी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते.

नेहमीच सोशल मीडियावर राखीच्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच राखीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या कारने नाही तर रिक्षाने फिरत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिला पापाराझींनी तुझी कार कुठेय? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने सर्वांनाच आश्चर्यचकित उत्तर दिलं आहे.

राखी सावंत नेहमीच आपल्या खासगी आयुष्यात चर्चेत राहते. कधी बॉयफ्रेंडसाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसते, तर कधी तिच्याच ब्रेकअप पार्टीत ती आपल्याला नाचताना दिसते. अशा विचित्र कारणांमुळे राखी नेहमीच चर्चेत राहते. यावेळी राखी चर्चेत येण्याचे कारण फार वेगळे आहे.

राखी काल सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे रिक्षामध्ये प्रवास करताना दिसली. तिची ही रिक्षा सवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी राखी पापाराझींशी बोलताना म्हणाली, माझा जुना ड्रायव्हर माझी अलिशान कार घेऊन फरार झाला. यावेळी त्याने माझा फोन आणि पैसे चोरले आहेत.

अभिनेत्रीच्या कारची चोरी झाल्यानंतर ती खूपच चिंतेत दिसत होती. यावेळी ती म्हणाली, तो कुठेही जाऊदे, कोणत्याही ग्रहावर जाऊदे, मी त्याला बरोबर शोधणार. तो गरीब असल्यामुळे मी त्याला कामावर ठेवले. आणि त्याने तो गैरफायदा उचलला.

त्याची बहिण देखील सध्या माझ्याच घरी आहे, ती माझ्या घरी घर काम करते. सोबतच तिने उत्तर प्रदेशात राहणाऱ्या तिचा ड्रायव्हर पप्पु विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवरा पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे सांगितले. सोबतच यावेळी राखी आवर्जुन म्हणाली की, मी चांद्रयान ३ चा आनंद साजरा करत होते, नेमका तेव्हाच या पप्पू यादवने माझ्या आयुष्याला ग्रहण लावले.

राखीची ही कमेंट ऐकून तिला नेटकरी म्हणतात, मॅडम तो चंद्रावर गेलाय, असं म्हणत तिला चिडवलंय. तर आणखी एक म्हणतो, राखीने त्याला पगार दिला नव्हता म्हणूनच त्याने तुझी गाडी आणि पैसे घेऊन फरार झालाय. तर काहींनी तिच्या कॉमेडीवरूनच तिला बोलले आहे. हे खरोखर आहे, राखी एक कॉमेडियन आहे, जर राखी असेल तर तुम्हाला कॉमेडी शो पाहण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT