Rohit Shetty Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Rohit Shetty Birthday: रोहित शेट्टी वयाच्या १७व्या वर्षांपासून करतोय दिग्दर्शन, इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करण्यापूर्वी सेटवर करायचा ‘ही’ कामं

Rohit Shetty News: आधी सहाय्यक दिग्दर्शक आणि नंतर दिग्दर्शक म्हणून राहणाऱ्या रोहित शेट्टीने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

Chetan Bodke

Rohit Shetty Birthday

बॉलिवूडमध्ये जसे ॲक्शन हिरो आहेत तसेच या अभिनेत्यांकडून ॲक्शन दिग्दर्शक देखील आहेत. ॲक्शन दिग्दशर्क म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येणारे नावं म्हणजे रोहित शेट्टी. बॉलिवूडमध्ये ॲक्शन चित्रपटांसाठी चर्चेत राहणाऱ्या रोहित शेट्टीचा आज वाढदिवस आहे. अभिनेता आज ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याचा जन्म १४ मार्च १९७३ रोजी मुंबईत झाला. आधी सहाय्यक दिग्दर्शक आणि नंतर दिग्दर्शक म्हणून राहणाऱ्या रोहित शेट्टीने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. (Bollywood)

रोहित शेट्टीचा जन्म १४ मार्च १९७३ रोजी मुंबईत झाला. रोहितचे वडील एम बी शेट्टी हे देखील कलाकार होते. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केले आहे. रोहित शेट्टीने वयाच्या १७ व्या वर्षी फिल्मी दुनियेत प्रवेश केला होता. १९९१ मध्ये रिलीज झालेल्या 'फूल और कांटे' चित्रपटातून रोहित शेट्टीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. रोहित शेट्टीने आपल्या सिनेकारकिर्दित ‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सह अनेक हिट चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. रोहित शेट्टीची बॉलिवूडमध्ये ॲक्शन दिग्दर्शक म्हणून त्याची सर्वत्र ओळख आहे. (Rohit Shetty)

रोहित शेट्टीचा वयाच्या १७ व्या वर्षी पहिला पगार जेमतेम ३५ रूपये इतका होता. या पगारातून रोहितचा जेवणाचा आणि प्रवासाचा खर्च भागायचा. रोहित दिग्दर्शक म्हणून डेब्यू करण्यापूर्वी त्याने ‘हकिकत’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी बॉलिवूड अभिनेत्री तब्बूची साडी इस्त्री करून दिली होती. तर रोहितने शूटिंगच्यावेळी काजोलचा हेयर आर्टिस्टचेही काम केले होते. त्यासोबतच त्याने स्पॉट बॉय म्हणूनही काम केले होते. रोहित शेट्टीने अ‍ॅक्शनसह कॉमेडी चित्रपट उत्तम केले आहेत. रोहित शेट्टीची गोलमाल चित्रपटाची सीरीज आजही लोक आवडीने पाहतात. रोहित शेट्टीने आपल्या चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. (Bollywood Film)

रोहित शेट्टीचे गाड्यांवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. रोहितच्या चित्रपटांमध्ये दिसल्याप्रमाणेच त्याच्याकडे गाड्यांचा संग्रह आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहित शेट्टीच्या 10 मजली शेट्टी टॉवरमध्ये चौथा मजला फक्त कार पार्किंगसाठी आहे. (Bollywood News)

रोहित शेट्टीकडे महिंद्रा स्कॉर्पिओ, रेंग रोव्हर स्पोर्ट, लॅम्बोर्गिनी, फोर्ड मस्टँग GT, मर्सडिज AMG G63 आणि Maserati Gran Turismo Sport सारख्या आलिशान कार आहेत. त्याचे एकूण ३०० कोटींच्या आसपसची संपत्ती आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT