Rajkummar-Patralekha  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rajkummar-Patralekha : कुणीतरी येणार येणार गं! बॉलिवूड कपलनं दिली गुडन्यूज, लग्नाच्या ४ वर्षांनी होणार आई-बाबा

Rajkummar-Patralekha Pregnancy : बॉलिवूडचे पावर कपल आता लवकरच आई-बाबा होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

2025 अनेक कलाकारांसाठी आनंदाचे ठरले. कोणी नवीन गाडी घेतली, कोणी आपल्या नात्याचा खुलासा केला तर कुणी स्वतःचे घर घेतले आहे. अशीच एक आनंदाची बातमी आता बॉलिवूडच्या अभिनेत्याने दिली आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या चार वर्षांनी राजकुमार राव आणि त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा (Rajkummar-Patralekha Pregnancy) दोघं आई-बाबा होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

राजकुमारने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात 'Baby On The Way' असे लिहिण्यात आले आहे. ही आनंदाची बातमी समजताच राजकुमार आणि पत्रलेखाच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच कलाकारांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टला राजकुमारने खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, 'खूप आनंदी' पोस्टवर 'राजकुमार आणि पत्रलेखा'असे नाव देखील लिहिलं आहे. त्यामुळे आता अजून एका बॉलिवूड कपलच्या घरी एक लहान पाहुणा येणार आहे.

राजकुमार आणि पत्रलेखाने 2021मध्ये लग्नगाठ बांधली आहे. 2014 मध्य रिलीज झालेल्या 'सिटीलाइट्स' चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एकत्र काम केले आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे चाहते दिवाने आहेत. राजकुमार 'मलिक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मलिक' 11 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

बॉलिवूडचे प्रेग्नेंट कपल

राजकुमार आणि पत्रलेखासोबत बॉलिवूडचे आणखी दोन कपल यावर्षी आई-बाबा होणार आहेत. बॉलिवूडची पावर जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहेत. तर दुसरीकडे खान कुटुंबात देखील छोट्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. अभिनेता अरबाज खान देखील लवकरच बाबा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT