Humaira Asghar Death
Actress Death SAAM TV

Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत घरात आढळला मृतदेह

Humaira Asghar Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले आहे. राहत्या घरी तिचा मृतदेह आढळला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Published on

मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. एका अभिनेत्रीचे निधन झाले आहे. ही अभिनेत्री पाकिस्तानी मॉडेल हुमायरा असगर आहे. वयाच्या 32 व्या वर्षी हुमायराने (Humaira Asghar Death ) अखेरचा श्वास घेतला आहे. हुमायरा असगरचा मृतदेह कराची येथील अपार्टमेंटमध्ये सापडला आहे. तिचा मृत्यू हा संशयास्पद आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुमायरा असगरचा मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला आहे. ही घटना कराची येथील कमर्शियल भागात घडली आहे. जेथे हुमायराचे घर आहे. तिच्या मृत्यूला जवळपास 10 ते 15 दिवस झाले आहेत. या बातीमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. मृतदेह अनेक दिवस घरात असल्यामुळे त्याला दुर्गंधी येऊ लागली. ज्यामुळे शेजारच्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले.

मीडिया रिपोर्टनुसार, हुमायरा असगरने घराचे भाडे दिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने तिला घर खाली करण्याचे आदेश दिले होते. पोलीसांनी घरात प्रवेश केल्यावर त्यांना पाकिस्तानी अभिनेत्री हुमायरा असगरचा मृतदेह आढळला. तेव्हा मृतदेह खूपच वाईट अवस्थेत होता.

ती गेली 7 वर्षांपासून या फ्लॅटमध्ये राहत होती. अद्याप तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार हा नैसर्गिक मृत्यू असावा असे बोले जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावरच मृत्यूचे खरे कारण कळेल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. घरातील CCTV फुटेज घेण्यात आले आहे. तसेच कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.

वर्कफ्रंट

हुमायरा असगरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. ती अभिनयासोबत मॉडेलिंग देखील करत होती. 'तमाशा घर' या मालिकेत ती झळकली. तसेच हुमायराने जलेबी चित्रपटात काम केले आहे.

Humaira Asghar Death
Metro In Dino Collection : सारा अन् आदित्यच्या केमिस्ट्रीची चाहत्यांना भुरळ, 'मेट्रो इन दिनों' चित्रपटानं ५ दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com