ED Raid Bollywood Production House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग ॲपमुळे बॉलिवूडमध्ये तांडव, ईडीकडून बड्या प्रॉडक्शन हाऊसवर छापेमारी

ED Raid Bollywood Production House: शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ईडीने याप्रकरणात मुंबई येथील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसच्या ५ कार्यालयावर छापेमारी केली.

Chetan Bodke

ED Raid Bollywood Production House

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची नावे समोर येऊ लागली आहे. त्यामुळे ईडीने आता या कलाकारांना आपल्या रडारवर घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ईडीने याप्रकरणात मुंबई येथील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसच्या ५ कार्यालयावर छापेमारी केली.

यावेळी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी प्रॉडक्शनला चित्रपट निर्मितीसाठी ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून चित्रपटासाठी आर्थिक मदत मिळाली होती.

हे प्रॉडक्शन हाऊस एका बॉलिवूड सेलिब्रिटीला घेऊन एका ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत होते. तो प्रादेशिक भाषेत बनवला जाणार असून त्याचा इतर भाषेत डब होणार आहे. यापूर्वी देखील ईडीने कुरेशी प्रॉडक्शनच्या अंधेरी येथील कार्यालयावर छापेमारी केली होती.

दरम्यान कुरेशी प्रॉडक्शन हाऊस वसीम कुरेशी आणि तबस्सुम कुरेशी यांचे असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच त्यांचा आर्थिक तपशील सुद्धा ईडीकडून तपासला जात आहे. या प्रकरणात ईडीच्या रडारवर अनेक बॉलिवूड कलाकार आहेत. (Entertainment News)

यामध्ये सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, सुनील ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंदान्ना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, नुसरत भरुचा, मलायका अरोरा, नोरा फतेही, मौनी रॉय, उर्वशी रौतेला यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. (Bollywood Actor)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

SCROLL FOR NEXT