Brahmastra  2
Brahmastra 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra 2 मध्ये ‘देव’ कोण? दिग्दर्शकांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

Chetan Bodke

Brahmastra 2: गेल्या वर्षी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. फक्त भारतातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगलीच कमाई केली. ब्रह्मास्त्रने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात दमदार कमाई करत २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून दबंग सलमानच्या सुलतान चित्रपटाचा विक्रम मोडित काढला. इतकी दमदार कमाई केल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली.

चित्रपटाने वर्ल्डवाइड ओपनिंग वीकेंडला आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा नंबर १ चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर परदेशातही उत्तम कामगिरी केली होती. अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ हा बनवायला तब्बल १० वर्षं घेतली. त्या दरम्यान चित्रपटाची निर्मिती करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. पण प्रदर्शित करताना त्या एका ही गोष्टीचा विचार न करता दिग्दर्शकांनी चित्रपट प्रदर्शित केला आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षशः डोक्यावर घेतलं.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या सिक्वेलचीही बरीच चर्चा रंगत होती. पण अखेर आता दिग्दर्शकांनी त्यावरील मौन सोडल आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जी म्हणाला की, “ब्रह्मास्त्र २ या चित्रपटावर काम सुरु असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

पुढे आयान मुखर्जी म्हणतो, “पहिल्या भागाप्रमाणेच आम्ही या दुसऱ्या भागासाठीही १० वर्षं घेतली तर आमचा चित्रपट पाहायला कुणीच येणार नाही, त्यामुळेच ‘ब्रह्मास्त्र २’ येत्या २ वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”अशी खात्रीही अयान मुखर्जीने दिली आहे.

यातील दुसऱ्या भागातील ‘देव’च्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. रणवीर सिंहपासून यशपर्यंत अनेक नावांची चर्चा होत आहे. या भूमिकेत कोण दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अयानने दिलेल्या माहितीनुसार ‘ब्रह्मास्त्र २’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT