Ashish Vidyarthi Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashish Vidyarthi Wedding: बॉलिवूडच्या व्हिलननं केलं दुसऱ्यांदा लग्न; वयाच्या ६०व्या वर्षी चढले बोहल्यावर...

Ashish Vidyarthi 2nd Wife बॉलिवूडचा खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

Chetan Bodke

Ashish Vidyarthi 2nd Marriage: बॉलिवूडचा खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली आहे. आशिषने रुपालीसोबत गुरुवारी रजिस्टर मॅरेज केलं आहे. अभिनेत्यानं हे दुसरं लग्न केलं आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्नगाठ बांधत सर्वानांच हा सुखद धक्का दिला आहे. मुख्य म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी अभिनेत्यानं लग्न केल्यामुळे चाहते चकित झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याचा श्रीगणेशा केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिष यांनी आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गुरुवारी कोलकात्यात पार पडलेल्या या लग्नात दोघांचेही कुटुंबीय आणि दोघांचेही जवळचे मित्र लग्नासाठी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे कपल मित्रमंडळीसाठी आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहे. आशिषच्या पत्नीबद्दल बोलायचे तर, आशिष यांनी आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सोबतच आशिष यांच्या पत्नीचे कोलकात्यात स्वत:च्या मालकीचं एका फॅशन स्टोअर देखील आहे.

ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकात्यातील मधील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे. आशिष आणि रुपाली यांनी आसामी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. आशिष विद्यार्थी म्हणतात, 'आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे, ही एक असामान्य भावना आहे. सकाळी कोर्ट मॅरेज आहे आणि संध्याकाळी सर्वांसाठी एक कार्यक्रम ठेवला आहे. लव्हस्टोरीबद्दल मीडियाशी बोलताना आशिष म्हणाले, 'ही एक खूप मोठी स्टोरी आहे. ते मी कधीतरी सांगेल. यावर रुपाली म्हणते, 'आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलो होतो, आम्ही आमचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आमचे लग्न अगदी साधेपणाने व्हावे अशी आम्हा दोघांची इच्छा होती.

रुपालीपूर्वी आशिषचे लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत झाले होते. राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत. आशिषबद्दल सांगायचे तर, तो हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहे. तो तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसला आहे. 

आशिष विद्यार्थी 'बिच्चू', 'जिद्दी', 'अर्जुन पंडित', 'वास्तव', 'बादल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला आहे. अलीकडेच अभिनेते अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'गुडबाय' मध्ये देखील दिसले आहेत. अभिनेता सोशल मीडियावर काही काळापासून खूप सक्रिय आहे आणि फूड ब्लॉगिंग देखील करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangesh Kalokhe : २० लाख नाही तर १ कोटींची सुपारी दिली, मंगेश काळोखे हत्या प्रकरणात शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप

Hair Care : केस वाढण्यासाठी 'हा' घरगुती हेअर मास्क तुम्ही कधीच लावला नसेल, लगेचच ट्राय करुन पाहा

Vande Bharat: वंदे भारतबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, २४ डब्याची ट्रेन लवकरच धावणार; आता प्रवास होणार आणखी सुसाट

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Long Haircuts For Women: लांब केसासाठी 5 युनिक हेअरकट्स, जे करायला सोपे अन् दिसायला भारी

SCROLL FOR NEXT