Hina Khan Admitted In Hospital Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hina Khan: 'आता शरीरात ताकद राहिली नाही...', 'नागिन' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल

Hina Khan Admitted In Hospital: हिनाने रुग्णालयात उपचार सुरू असलेले फोटो शेअर केला आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत असून ते पाहून तिचे चाहते चिंतेत आले आहेत. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

Priya More

Hina Khan Hospitalized:

बॉलिवूड आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या (Hina Khan) चाहत्यांना चिंतेत आणणारी बातमी समोर आली आहे. हिना खानच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. स्वत: अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. हिनाने रुग्णालयात उपचार सुरू असलेले फोटो शेअर केला आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत असून ते पाहून तिचे चाहते चिंतेत आले आहेत. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

हिना खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये हिना हॉस्पिटलच्या बेडवर बसून खिडकीतून बाहेर बघताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये हिनाने थर्मामीटरचा फोटो शेअर केला आहे. तिने हातामध्ये थर्मामीटर पकडले असून त्यावर आलेले तिचे बॉडी टेम्परेचर १०२ डीग्री असल्याचे ती दाखवत आहे. तिचे हे दोन्ही फोटो पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Hina Khan Hospitalized

थर्मामीटरचा फोटो शेअर करत त्यावर हिना खानने लिहिले आहे की, 'मला खूप ताप आहे आणि गेल्या चार रात्री माझ्यासाठी खूप वाईट गेल्या आहेत. माझ्या शरीराचे तापमान सतत १०२-१०३ असते. माझ्या शरीरामध्ये आता काहीच ताकद राहिलेली नाही. हे खूपच त्रासदायक आहे. ज्यांना माझी काळजी आहे. त्यांना कळवा की मी लवकरच परत येईन.' दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे आणि कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, 'लाइफ अपडेट. चौथा दिवस.'

दरम्यान, नुकताच हिना खान तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटात हिनाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले. तिचा हा चित्रपट ६ ऑक्टोबरला अमेरिकेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चांगली कमाई केली. हिना खानचा 'कंट्री ऑफ ब्लाइंड' हा चित्रपट इंग्रजी लेखक एचजी वेल्स यांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात हिना खान मुख्य भूमिकेत आहे. हिनासोबत या चित्रपटात इनामुलहक, प्रद्युमन सिंग मॉल, अनुष्का सेन, नमिता लाल, मीर सरवर, जितेंद्र राय, अहमर हैदर आणि हुसैन खान हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT