Gurmeet Choudhary Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gurmeet Choudhary's Video: गुरमीत चौधरी बनला रिअल लाईफ हिरो, बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला CPR देऊन मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर

Gurmeet Choudhary's Viral Video: गुरमीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या सामाजिक कार्याचे सर्वस्तरावरून खूप कौतुक होत आहे.

Priya More

Gurmeet Choudhary Save Life Of Person:

बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरी (Actor Gurmeet Choudhary) सध्या चर्चेत आला आहे. गुरमीत चौधरीचा एक व्हिडीओ (Gurmeet Choudhary Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गुरमीत रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला सीपीआर देताना दिसत आहे. गुरमीतमुळे या व्यक्तीचे प्राण वाचले आहे. गुरमीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या सामाजिक कार्याचे सर्वस्तरावरून खूप कौतुक होत आहे.

गुरमीत चौधरी अंधेरीतील रस्त्यावरून प्रवास करत होता. त्यावेळी त्याला रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत दिसला. या व्यक्तीला पाहून गुरमीत तातडीने आपली कार रस्त्याच्या कडेला उभं करतो आणि त्याच्या मदतीसाठी धावून जातो. गुरमीत या व्यक्तीला सीपीआर देतो. त्यानंतर तो रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना देखील मदतीसाठी बोलावून घेतो. त्यानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी होते. गुरमीतने या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. काही वेळातच या व्यक्तीला शुद्ध येते.

गुरमीत चौधरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही अभिनेत्याचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहून त्याला रिआल लाईफ हिरो म्हटले जात आहे. गुरमीतच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'खूप भारी गुरमीत भाई', तर दुसऱ्या यूजरने कमेंट करताना लिहिले की - 'प्रत्येक अभिनेता आधी माणूस असला पाहिजे आणि नंतर अभिनेता.'

दरम्यान, गुरमीत चौधरीने 'रामायण'मालिकेमध्ये श्रीरामाची भूमिका साकारली होती. आपल्या दरमदार अभिनयाच्या जोरावर त्याने अल्पावधितच प्रसिद्धी मिळाली. यानंतर गुरमीतने 'गीत हुई सबसे पराई'मध्ये मानसिंग खुरानाची भूमिका साकारली होती. त्याने कृतिका सेंगरसोबत 'पुन्नर विवाह'मध्येही काम केले होते. त्याने 'झलक दिखला जा 5', 'नच बलिए 6' आणि 'खतरों के खिलाडी 5' यासारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT