Priyanka Chopra Returned Los Angeles Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra चा भारत दौरा संपला, निक आणि मालतीसोबत सासरी परतली; एअरपोर्टवरील VIDEO व्हायरल

Priyanka Chopra Returned Los Angeles: प्रियंका चोप्रा, पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेला रवाना झाली. ३१ मार्चच्या पहाटे प्रियंका मुंबई एअरपोर्टवर कुटुंबासोबत स्पॉट झाली. यावेळी प्रियंकाने मालतीला कडेवर घेतलं होतं.

Priya More

Priyanka Chopra Video:

बॉलिवूडची (Bollywood) 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये होती. पती निक जोनास (Nick Jonas) आणि मुलगी मालतीसोबत ती भारतामध्ये आली होती. यावेळी प्रियंकाने आपल्या कुटुंबीयांसोबत खूप धम्माल केली. एका इंटरनॅशनल ज्वेलरी ब्रँडच्या ओपनिंगसाठी ती भारतामध्ये आलेली. यावेळी तिने कुटुंबीयांसोबत होळी साजरी केली. त्याचसोबत बहीण मन्नारा चोप्राच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये देखील ती सहभागी झाली होती. भारतमध्ये धम्माल केल्यानंतर आता प्रियंका चोप्रा पुन्हा परदेशी गेली. एअरपोर्टवरील तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियंका चोप्रा, पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेला रवाना झाली. ३१ मार्चच्या पहाटे प्रियंका मुंबई एअरपोर्टवर कुटुंबासोबत स्पॉट झाली. यावेळी प्रियंकाने मालतीला कडेवर घेतलं होतं. यावेळी निक जोनासने फोटोग्राफर्सला आवाज न करण्याचा इशारा केला. जेणेकरून त्यांची मुलगी मालती झोपेतून उठू नये. प्रियंका, निक आणि मालतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रियांका चोप्राने मायदेशी आल्यानंतर भारतातील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. दिल्लीत तिने कुटुंबीयांसोबत होळी साजरी केली. बहीण मन्नारा चोप्राच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही तिने कुटुंबासोबत हजेरी लावली. यावेळी प्रियंकाची बॉलिवूडच्या काही प्रोजेक्ट्सबद्दल चर्चा सुरू होती आणि यासंदर्भात ती बराच काळ भारतात राहिली होती.

भारतामध्ये काही दिवस मुक्काम केल्यानंतर प्रियंका चोप्रा तिच्या घरी परत गेली. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियंक चोप्रा कुटुंबासह लॉस एंजेलिसमध्ये राहते.भारतामध्ये असताना कुटुंबासोबत होळी सेलिब्रेशन केल्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रियंकाने यावेळी निक जोनाससोबत डान्स केला होता. संपूर्ण कुटुंबाने तलावाजवळ मोठ्या उत्साहात होळी खेळली. मन्नाराही ढोलाच्या तालावर खूप नाचली.

प्रियंका भारत दौऱ्यादरम्यान अयोध्येतील राम मंदिरातही गेली होती. तिने सहकुटुंब राम मंदिराला भेट देत रामलल्लाचे दर्शन घेतले होते. प्रियंका चोप्रासोबत निक जोनास आणि मालती मेरी, आई मधु चोप्रा देखील भक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेले दिसले. यावेळी सर्वजण पारंपारिक लूकमध्ये दिसले होते. अभिनेत्रीने अयोध्या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियंका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंका शेवटची 'लव्ह अगेन' आणि 'सिटाडेल' चित्रपटामध्ये दिसली होती. यावर्षी ती 'टायगर' चित्रपटात निवेदकाची भूमिका साकारणार आहे. तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर, ती 'हेड्स ऑफ स्टेट' या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोयाबीनच्या बाजारात भ्रष्टाचाराचे दलाल, मंत्र्याच्या OSDच्या नावानं लाखोंची मागणी

अपात्र लाडकींनी लुटले 165 कोटी, 12 हजार पुरुषांचाही सरकारी तिजोरीवर डल्ला

भाजप नेत्याच्या मुलीचा भरदिवसा विनयभंग; दुचाकीस्वाराने कानशि‍लात लगावली, घटना CCTVत कैद

Maharashtra Live News Update: नागपुरात बारमध्ये तोडफोड केल्याची व्हिडिओ व्हायरल

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

SCROLL FOR NEXT