Brahmastra  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या चित्रपटाने पार केला 100 कोटींचा टप्पा; तिसऱ्या दिवशी केला इतका व्यवसाय

चित्रपटाला सुरुवातीला बायकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागले. पण हा चित्रपट त्याच्या शीर्षकाप्रमाणेच बॉलिवूडचा ब्रह्मास्त्र म्हणून उदयास आला.

Shivani Tichkule

मुंबई - रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोघांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचा प्रत्येक शो हाऊसफुल्ल आहे. चित्रपटाला सुरुवातीला बायकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागले. पण हा चित्रपट त्याच्या शीर्षकाप्रमाणेच बॉलिवूडचा ब्रह्मास्त्र म्हणून उदयास आला. या चित्रपटाने आपल्या देशातच नव्हे तर जगभरात हिटचा झेंडा रोवला आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपट तीन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाचे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. जे पाहून असे म्हणता येईल की काही दिवसात हा चित्रपट 200 कोटींचा टप्पाही पार करेल.

हे देखील पाहा -

रणबीर कपूरने त्याच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. कोणत्याही सुट्टीशिवाय या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. रणबीरने त्याच्या 'संजू' चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला आहे. हा वीकेंड रणबीरसाठी सर्वात मोठा ओपनिंग ठरला आहे.

ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी 37 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 42 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 46 कोटींची कमाई केली आहे. रविवारी ब्रह्मास्त्राने मोठी कमाई केली आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 125 कोटींच्या आसपास झाली आहे. तीन दिवसांत 125 कोटींची कमाई केल्यानंतर या चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

ब्रह्मास्त्रला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत, तर काहीजण चित्रपटाच्या VFX ची खूप प्रशंसा करत आहेत. आलिया आणि रणबीरचा चित्रपट रिलीज झाल्यापासून दोघेही आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तो पाहण्याची विनंती करत आहेत. या दोघांसाठी हा खूप खास क्षण आहे कारण दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केले आहे आणि आता लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT