Akshay Kumar Played Voleyball With Uttarakhand Police  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Played Voleyball: ‘काम राहिलं बाजूला आणि खेळतोय...’ पोलिसांसोबत व्हॉलिबॉल खेळताना अक्षयचा व्हिडीओ व्हायरल

Akshay Kumar Vollyball Playing Video Viral: अक्षय कुमारने सध्या उत्तराखंडमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सोडून पोलिसांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसला.

Chetan Bodke

Akshay Kumar Played Voleyball With Uttarakhand Police: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे सोशल मीडियावरच नाही तर सर्वत्र ट्रेंडिंगवर आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट आणि यावर्षी प्रदर्शित झालेला एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप झाला. अक्षयला मिळालेले हे सतत अपयश सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या चित्रपटांच्या कथेवरून सोशल मीडियावर नेटकरी अनेकदा त्याला ट्रोल करतात.

तुफान ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी, सध्या अक्षय कुमार उत्तराखंडमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. नुकताच अक्षयने शूटिंग दरम्यान पोलिसांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अक्षय कुमारचं वय जरी आज ५५ वर्ष असलं तरी, तो आजही मैदानी खेळ खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. आपल्या फिटनेसला व्यवस्थित ठेवण्यासाठी अक्षय कुमार नेहमीच खेळाला पहिले महत्व देतो. फावल्या वेळात अक्षय नेहमीच मैदानी खेळ खेळतो. त्याचे खेळाविषयी असलेले प्रेम आपण नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो. सध्या अक्षयचे सोशल मीडियावर व्हॉलीबॉल खेळतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.

डेहराडूनमध्ये अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे, सध्या त्याचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अक्षय उत्तराखंड पोलिसांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. स्पोर्टिंग व्हाईट स्नीकर्स ग्रीन अँड ब्लॅक टी-शर्ट आणि निळ्या लोअर्स घालून अक्षयने उत्साहात व्हॉलीबॉल खेळाचा आनंद लूटला. अक्षय कुमारचे हे फोटो २६ मे २०२३ चे आहेत. डेहराडूनच्या पोलीस लाईनमध्ये तो व्हॉलीबॉल खेळत होता.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार हा केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी देखील पोहचला होता.. अभिनेत्याने सोशल मीडियावर मंदिराचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले- 'जय बाबा भोलेनाथ.' ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर अक्षय कुमारने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची सुद्धा भेट घेतली. यावेळी त्याने उत्तराखंड राज्यात नवीन फिल्म इंडस्ट्री हब बनवण्याबाबतच्या निर्णयावर संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत लवकरच ‘OMG- ओह माय गॉड’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर जाहीर झालेली नाही. याशिवाय त्याच्याकडे अली अब्बास जफरचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ देखील आहे, ज्यामध्ये तो टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २०२४ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT