Shah Rukh Khan On New Parliament: शाहरुख खानने नवीन संसद भवनाला दिली खास उपमा; स्वत:च्या आवाजात शेअर केला व्हिडिओ

Shah Rukh Khan Gives Voice New Parliament Video: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या भवनाचं उद्घाटन होणार असून या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ट्वीटरवर त्याच्या भारदस्त आवाजात संसद भवनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Shah Rukh Khan Shared Parliament Video
Shah Rukh Khan Shared Parliament VideoSama Tv
Published On

Shah Rukh Khan Shared Parliament Video: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या भवनाचं उद्घाटन होणार आहे. भारतीय परंपरेचं प्रतिक असलेले सेंगोल आज या भवनात स्थापन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ट्वीटरवर त्याच्या भारदस्त आवाजात संसद भवनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Shah Rukh Khan Shared Parliament Video
Kushal Badrike Share Post: मुलांना आपले सुपरहिरो आधी कळायला हवेत... कुशल बद्रिकेने पोस्ट करत इतिहास जाणून घेण्याचे केले आवाहन

आज देशाला नवीन संसद भवन मिळणार असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद वास्तूचे उद्घाटन केले जाणार आहे. त्या आधी दोन ते तीन दिवस आधी सोशल मीडियावर नव्या संसदेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आता त्याच व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने आपला भारदस्त आवाज देत व्हिडीओला सोशल मीडियावर शेअर केला आहे. नव्या संसदेच्या वास्तूची व्हिडीओ अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शेअर केले आहे. सोबतच खासदार आणि बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही नव्या संसद भवनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shah Rukh Khan Shared Parliament Video
Athiya Shetty Post: ‘आधी पुरावे दाखवा आणि मग...’ स्ट्रीप क्लब प्रकरणावर आथियाने पतीच्या समर्थनार्थ केलेली पोस्ट चर्चेत

शाहरुख खानने व्हिडिओ ट्विट करत कॅप्शन लिहिले की, “जे लोक आपल्या संविधानाचे समर्थन करतात, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात आणि लोकांच्या विविधतेचे रक्षण करतात. त्यांच्यासाठी हे नवीन वास्तू खूपच भव्य आहे. नवीन भारतासाठी संसदेची इमारत, पण भारताच्या गौरवाचे जुने स्वप्न. जय हिंद”

दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान म्हणतो, “भारताचे नवीन संसद भवन, आपल्या आशा- आकाक्षांचे नवे घर. आपल्या संविधानाची काळजी घेणाऱ्यांसाठी एक घर, जिथे १४० कोटी भारतीय एक कुटुंब म्हणून कायम राहत आहेत. हे नवीन घर इतकं मोठं असावं की त्यात देशातील प्रत्येक प्रांत, राज्य, गाव, शहर यांसाठी एक विशिष्ट जागा असेल. या घराच्या भिंती इतक्या मोठ्या असाव्यात की, देशातील प्रत्येक जाती-प्रजाती प्रत्येक धर्मावर प्रेम करू शकतील. त्यांच्या डोळ्यांची दृष्टी इतकी दुरची असावी की, ते देशातील प्रत्येक नागरिक पाहू शकतील. त्यांच्या समस्यांचेही येथे निराकरण व्हायला हवे. या वास्तूत सत्यमेव जयते च्या घोषणा स्लोगन म्हणून नाही तर एक विश्वास निर्माण करायला हवा. सोबतच या वास्तूत अशोक चक्रातील हत्ती-घोडा, सिंह आणि अशोक चक्रातील स्तंभ हा लोगो नसून आपल्या इतिहासातील ओळख निर्माण करावी.”

Shah Rukh Khan Shared Parliament Video
Kamal Haasan at IIFA : कमल हसन देखील 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या विरोधात... यफाच्या मंचावरून केली टीका

त्याचबरोबर हेमा मालिनी यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात हेमा मालिनी म्हणतात, “नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी न्याय आणि निष्पक्षतेचे प्रतीक आणि धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पवित्र सेंगोलचा स्वीकार करतील. आणि नवीन इमारतीत स्थापित करा. ही देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे.”

संसदेच्या नव्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विविध पीठांचे साधू तसंच विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com