Actress Zareen Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zareen Khan Hospitalized: अभिनेत्री जरीन खान रुग्णालयात दाखल

Latest Bollywood News: जरीनने स्वत: सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Priya More

Bollywood News: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जरीन खानची (Actress Zareen Khan) तब्येत अचानक बिघडली. जरीनला डेंग्यूची (Dengue) लागण झाली असून तिला तापासोबतच अंगदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

जरीनने स्वत: सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. जरीन आजारी असल्याचे कळताच तिचे चाहते चिंतेत आले असून ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

जरीन खानने तिच्या अनधिकृत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिच्या हातात ड्रिप लावलेले दिसत होते. थोड्याच वेळात तिने ही पोस्ट काढून टाकली. त्यानंतर तिने ज्यूसचा ग्लास असलेला आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोला तिने 'रिकव्हरी मोड'असे कॅप्शन दिले आहे.

Zareen Khan Insta Post

जरीन खानने आपल्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना आवाहन केले आहे. तिने आपल्या चाहत्यांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वच्छ आणि डासमुक्त वातावरण राखण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करा असा सल्ला तिने दिला आहे.

जरीन खान बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'हेट स्टोरी 3', 'वीर', 'वजा तुम हो' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. बॉलिवूडसह तिने पंजाबी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीला कतरिना कैफची कॉपी म्हटले जाते. कदाचित यामुळेच या अभिनेत्रीला हिंदी चित्रपटसृष्टीत खूप लवकर आणि चांगली प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

७ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुवेंदू अधिकारींचा आमदारकीचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Flat Stomach Tips: कोणताही व्यायाम न करता पोट होईल सपाट! फक्त बदला तुमच्या 'या' सवयी

Maharashtra News Live Update: - सीबीआयकडून लातूर मधील खाजगी क्लास चालकाची तब्बल 9 तास कसून चौकशी

IAS Transfer: 15 सीनियर IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासकीय विभागात मोठा फेरबदल

Numerology: 'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रामाणिक अन् रोमॅंटिक; मनापासून जपतात नाती

SCROLL FOR NEXT