Vidya Balan On Body Shaming Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vidya Balan On Body Shaming: ‘मला माझ्या शरीराची लाज वाटायची...’ असं का म्हणाली विद्या बालन?

Vidya Balan News: बॉलिवूडसाठी बॉडीशेमिंगचे प्रकरण काही नवीन नाही. विद्या बालन देखील बॉडी शेमिंगचा बळी पडली होती. नुकतंच तिने यावर भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Vidya Balan Discloses She Started Hating Her Own Body: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयामुळे आणि तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ती ओळखली जाते. विद्या आजही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. डर्टी पिक्चर आणि बेगम जान मधून तिने आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर भूरळ पाडली. सध्या विद्याचं एका वक्तव्य सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहे.

बॉलिवूडसाठी बॉडीशेमिंगचे प्रकरण काही नवीन नाही. विद्या बालन देखील बॉडी शेमिंगचा बळी पडली होती. तिने त्यासाठी अनेक वर्ष विशेष मेहनत देखील घेतली आहे. लवकरच अभिनेत्री विद्या बालन हिचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नियत या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच तिने या चित्रपटाच्या मुलाखती दरम्यान ती देखील बॉडी शेमिंगची बळी झाली होती, यावर तिने या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

बॉडी शेमिंगबद्दल विद्या म्हणते, ती तिच्या बॉडीमुळे काहीवेळ खूपच अस्वस्थ होते. मी माझ्या शरीरात खूप बदल करण्याचे ठरवले,पण मी माझ्या शरीरासोबत जगायला शिकसे. माझ्या शरीरात काही बदल होणार नाही म्हणून मी तसेच जगायला शिकले. माझ्या बॉडीवरून अनेकदा मला टोमणे मारले जायचे. ही कशी आहे दिसायला. अशा कमेंट्स लोकं माझ्यावर करायचे. मी मात्र यावर खचून न जाता त्यावर मात केली. माझ्या शरीरावरून मला आई देखील बोलली होती.

विद्या पुढे आपल्या मुलाखतीत म्हणाली, मला माझ्या शरीराची लाज वाटायची. मी या विचारात अनेक काळ संघर्ष केला होता. काही वेळाने मला माझ्या शरीराचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आले. एकदा मला माझ्या शरीराचा देखील तिटकारा आला होता. ती या कारणामुळे अनेकदा आजारी देखील पडली होती. नंतर मला जाणवलं की, आपण या सगळ्यावर मेहनतीनं मात करायला हवी. त्यानंतर आताचे चित्र वेगळे आहे.

विद्याचा बॉलिवूडमधील प्रवास फारच खडतर होता. तिने एका जाहिरातीच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. तिने स्पर्धात्मक जगात देखील स्वत:चे स्थान निश्चित केले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयातून तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. तिच्या या बॉलिवूड प्रवासातील चढ- उतारात आपल्याला कित्येक वेगवेगळ्या चित्रपटांतून तिच्या अभिनयाचा दर्जा कळाला. इश्किया, शेरनी, शकुंतला देवी, कहानी, कहानी २ या सारख्या चित्रपटांमधून विद्यानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT