Vidya Balan Birthday Special: 1 जानेवारी 1979 रोजी एका तामिळ कुटुंबात विद्या बालनचा जन्म झाला. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला या क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी तिच्या शरीरावर प्रश्न उपस्थित केले गेले. तर कधी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली. काहींनी तर तिला अगदी अपशकुनी ठरवलं. अशा वातावरणात तुम्ही काम करण्याचा विचार देखील करू शकत नाही.
विद्या बालन म्हणते, जर तुम्ही तुमचे काम परफेक्शनने केलात तर यश तुमच्या पायाशी लोळण घेते. ज्या विद्याला एके काळी ती नायिका होण्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले गेले होते, त्याच विद्याला भारत सरकारने राष्ट्रीय पुरस्कार (Award), पद्मश्री देऊन गौरवले आहे. विद्याच्या वाढदिवसानिमित्त पाहूया तिचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास.
माधुरी दीक्षित आणि शबाना आझमी यांना पाहिल्यानंतर चित्रपटांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्याने वयाच्या १६ व्या वर्षी 'हम पांच' या टीव्ही शोमधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. तिची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विद्या बालन एका मल्याळम चित्रपटातून तिच्या चित्रपट क्षेत्रातील करिअरची सुरुवात करणार होती, पण काही कारणास्तव चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले नाही, याचा दोष दिग्दर्शकाने विद्या बालन दिला आणि तिच्या अपशकुनी म्हटले. (Celebrity)
विद्या बालनच्या लठ्ठपणावरही अनेकांनी टीका केली. विद्याच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवली गेली, पण विद्याने हार मानली नाही. तिला या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अखेर तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले. सैफ अली खानसोबतच्या 'परिणिता'मध्ये तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. विद्या बालनने वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट करून आपला दमदार अभिनयाने वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले. 'भूल भुलैया', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'परिणीता', 'मुन्ना भाई एमबीबीएस' यांसारख्या चित्रपटांमध्ये विद्याची वेगळी स्टाईल पाहायला मिळाली.
विद्या बालनने अनेक अॅड फिल्म्समध्ये काम केले आहे. विद्याला स्वच्छता करणे आणि पुस्तके वाचण्याचा छंद आहे. विद्या बालनने चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले आहे. विद्या बालननेही तिच्या चित्रपटातून यश आणि संपत्ती मिळवली आहे. ती जवळपास 190 कोटींची मालकीण आहे. विद्या बालन लवकरच 'नियत' चित्रपटात दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.