अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे ७० लाखांचे दागिने लंडन विमानतळावरून चोरीला गेले.
उर्वशीने एका निवेदनातून ही माहिती जाहीर केली.
बॅग कोणीतरी पळवल्याचं तिने सांगितलं आहे.
दोन वर्षांपूर्वीही अशीच एक चोरीची घटना तिच्यासोबत घडली होती
उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. आता उर्वशी चर्चेत राहण्याचं कारणं म्हणजे, तिचे ७० लाखांचे दागिने चोरीला गेलेत. विशेष म्हणजे लंडनच्या विमानतळावरून तिचे दागिने चोरीला गेल्याचा दावा तिने केलाय. उर्वशी रौतेलाने एक निवेदन जारी करून संपूर्ण माहिती दिलीय. कोणीतरी तिची बॅग घेऊन पसार झाल्याची तिने निवेदनात सांगितलंय.
अभिनेत्री उर्वशी रौतेला सांगितलं की, लंडनमधील गॅटविक विमानतळावरून दागिने चोरीला गेलेत. एका बॅगेत ७० लाख रुपयाचे दागिने ठेवले होते, तीच बॅग कोणीतरी पळवलीय. तिने सांगितलं की, ती विम्बल्डन पाहण्यासाठी लंडनला गेली होती. त्यादरम्यान तिची बॅग लगेज बेल्टमधून गायब झाली. उर्वशीच्या म्हणण्यानुसार, तिने तिची बॅग शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती सापडली नाही. याबाबत उर्वशीनं एक निवदेन जारी केलंय. यात तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिलीय.
एका प्लॅटिमन एमिरेट्स मेंबर आणि ग्लोबल आर्टिस्ट म्हणून आपण विम्बल्डन पाहण्यासाठी गेली होती. मुंबई एमिरेट्ससाठी आम्ही उड्डाण भरल्यानंतर आम्ही लंडन गॅटविक विमानतळावरील बॅगेज बेल्टवरून आमचं क्रिश्चयन डायर ब्रायन बॅगची चोरी झाली. आमच्या बॅगवर टॅग आणि तिकीट होतं. तरीही आमची बॅग बेल्ट एरियातून गायब झाली.
यावरून विमानतळाच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचं अभिनेत्री उर्वशी म्हणालीय. 'ही फक्त हरवलेल्या बॅगेची बाब नाही, तर ही सर्व प्रवाशांची जबाबदारी, सुरक्षितता आणि आदराची बाब आहे.' तिने मदतीसाठी एमिरेट्स आणि गॅटविक विमानतळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु तिला कोणतीही मदत मिळाली नाही, असा दावाही उर्वशीनं केलाय.
२०२३ मध्येही उर्वशी रौतेलासोबत चोरीची घटना घडली होती. तेव्हा ती अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेली होती. तिथे उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला होता. यासाठी उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर पोलिसांची मदत मागितली होती, ज्यामुळे तिची खूप खिल्ली उडवली गेली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.