Urmila Matondkar In Khupte Tithe Gupte  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar In Khupte Tithe Gupte: राज ठाकरे की उद्धव ठाकरे, महाराष्ट्र समर्थपणे कोण सांभाळू शकतं? उर्मिला मातोंडकरांच्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या

Urmila Matondkar News: रविवारच्या भागात अवधूत गुप्तेच्या शोमध्ये सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हजेरी लावणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Khupte Tithe Gupte Episode Teaser: अवधूत गुप्ते होस्ट करत असलेला ‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो सध्या टेलिव्हिजन विश्वात बराच चर्चेत आहे. या शो मध्ये आतापर्यंत अनेक राजकारण्यांनी प्रमुख पाहूणे म्हणून हजेरी लावलीय. या शो मध्ये अवधूत त्याच्या खास शैलीत प्रश्न विचारून सर्वांकडूनच उत्तर मिळवतो. येत्या रविवारच्या भागात अवधूत गुप्तेच्या शोमध्ये सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हजेरी लावणार आहे.

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सिनेविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. उर्मिला सध्या चित्रपटात झळकलेली नाही. नेहमीच ती विविध विषयांवर आपले रोखठोक आणि स्पष्ट मत मांडताना प्रेक्षकांना दिसते. येत्या रविवारच्या भागात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हजेरी लावणार आहे. नुकताच ‘झी मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर आगामी एपिसोडचा टिझर शेअर करण्यात आला.

व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये अवधूत उर्मिलासोबत एक रॅपिड फायर खेळत आहे. त्यामध्ये तो प्रश्न विचारतो, ‘कोणते ठाकरे महाराष्ट्र जास्त समर्थपणे सांभाळू शकतात? राज ठाकरे की उद्धव ठाकरे?’ यावर उर्मिलाने अवधूतला हसत हसत उत्तर दिले. उर्मिला म्हणते, ‘एकत्रित दोघेही सिम्पल’

नंतर अवधूतने उर्मिलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा फोटो दाखवत एक प्रश्न विचारला. ‘कोणता नेता साधा माणूस वाटतो नरेंद्र मोदी की राहुल गांधी...’ असा हा प्रश्न होता. हा प्रश्न काय आहे... असं म्हणते त्यांनी हास्यातून उत्तर दिलं.

आता अवधूत उर्मिलाला आणखी कसे प्रश्न विचारणार?, उर्मिला या शोमध्ये आणखी काय काय खुलासे करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येत्या रविवारच्या खास भागाचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आलाय. त्यामुळे सध्या प्रेक्षक या आगामी भागासाठी उत्सुक आहेत. उर्मिला आणखी कोणत्या विषयांवर गप्पा मारणार, खासगी आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना कशी उत्तर देणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

SCROLL FOR NEXT