Urfi Javed Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Viral Video: उर्फीचा गेला तोल, सोशल मीडियावर झाली ट्रोल

शेअर केलेल्या व्हिडिओत उर्फी एका झोपाळ्यावर झोका घेत असताना तिचा हात सुटतो आणि ती खाली निसटते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उर्फी आपल्या हटके फॅशनने चर्चेत असते (Bollywood Actress). तिच्या फॅशनची चर्चा समाज माध्यमांवर जोरात असते. काही दिवसापुर्वी तिचे एक नवे गाणे प्रेक्षकांचे भेटीला आले होते. त्या गाण्याचे नाव 'हाय ये है मजबूरी' असे आहे. १९७४ वर्षात प्रदर्शित झालेल्या 'रोटी, कपडा और मकान' चित्रपटातील गाण्याचे हे रिमेक आहे. गाण्याला राजेश मंथनचे बोल मिळाले असून गाण्याला श्रृती राणेचा आवाज लाभला आहे. हे गाणे गेल्या आठवड्यात ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला आहे. या गाण्यात तिचा एक हटके, बोल्ड आणि ग्लॅमरस लूक दिसत आहे. तिने या गाण्याचा एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. (Bollywood) (Marathi Entertainment News)

या शेअर केलेल्या व्हिडिओत उर्फीने शूटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. त्या व्हिडिओत उर्फी एका झोपाळ्यावर झोका घेत असताना तिचा हात सुटतो आणि ती खाली निसटते. पावसामुळे झोक्यावर पाणी असल्याने तिचा त्या झोक्यावरुन पाय निसटल्याचे सांगितले जात आहे. तिथे उपस्थित असलेल्या टीमने तिला लगेच वाचवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत तिची ऑरेंज रंगाची साडी दिसत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओच्या खाली तिने कॅप्शन बॉक्समध्ये तिने लिहिले की, 'ही घटना खरोखरच घडली होती. BTS #hayehayeyehmajboori.'

ही व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये एकच हास्य निर्माण झाले. तिच्या कमेंट बॉक्समध्ये लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. ती पडल्यावर बऱ्याच चाहत्यांनी कमेंट करत 'तू ठिक आहेस ना' हा प्रश्न आवर्जुन विचारला. उर्फीने १५ ऑक्टोबरला २५ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टीला मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार मंडळी सोबतच तिचे मित्रमंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उर्फी जावेदने टीव्ही मालिकांमध्ये आणि बिग बॉस ओटीटीमध्येही आपले कौशल्य दाखवले. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूपच धरपड करत आहे. रोज उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने सगळ्यांचे मनोरंजन करते. आपल्या अतरंगी फॅशनने चाहत्यांना थक्क करत असते.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Son Of Sardaar 2 : ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार २' ओटीटीवर कुठे पाहता येणार?

Honda Bike: होंडाने लाँच केली स्वस्त बाईक; Hero Xtreme ला जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maharashtra Live News Update : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वर दर्शनाला

Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

Kumbha Rashi : कुंभ राशीचे भाग्य आज उजळणार, गरिबी होणार दूर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT