Urfi Javed And Chitra Wagh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: 'महिलांच्या अनुत्तरित प्रश्नाचं काय?' चित्रा वाघ यांच्या टिकेवर उर्फीची खरमरीत प्रतिक्रिया...

तिच्या या विचित्र कपड्यांवरुन आणि हटक्या आऊटफिटमुळे कडक कारवाई करावी अशी मागणी बऱ्याचदा करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed: आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच हटक्या फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्लाही तिला अनेकांनी दिला.

मग ऐकेल ती उर्फी कसली. तिच्या या विचित्र कपड्यांवरुन आणि हटक्या आऊटफिटमुळे कडक कारवाई करावी अशी मागणी बऱ्याचदा करण्यात आली आहे.

दरम्यान, काल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघही उर्फी जावेदवर भडकल्या होत्या. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत उर्फीच्या अटकेची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर आता तिने प्रत्युत्तरही केले आहे. अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे, तिच्यासाठी ट्रोलिंगहा प्रकार नवा नाही.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल मुंबई पोलीसांकडे ट्वीट करत मागणी केली की,'शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' चित्रा वाघ यांच्या या ट्वीटवर आता उर्फीनेही प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत उर्फी म्हणते, 'तुमच्यासारख्या राजकारण्यांना पाहून खूपच वाईट वाटते. नागरिकांच्या नजरेसमोर येण्यासाठी माझ्यावर टिका केली जात आहे. बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्याला दोष देणं फार सोप्प आहे. बेरोजगारी, लाखो बलात्कार झाल्याची प्रलंबित प्रकरणं, खुनांची अनेक प्रकरणं आणि अनेक समस्या आहेत त्यांचं काय?'

'तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. ज्या महिलांना खरंच मदतीच्या हाकेची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही का काही करत नाहीत? महिलांचं शिक्षण, त्यांचा विकास याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?' अशा अनेक प्रश्नांची मालिका लावत तिनेही प्रत्युत्तर दिले.

दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून राहूल गांधींना ट्रोल करण्यासाठी उर्फीच्या नावाचा वापर करण्यात आला. तिच्या नावाचा वापर करत एका भाजपा कार्यकर्त्याने ट्वीट केले होते. यामुळे ती बरीच संतापली देखील होती. स्क्रिनशॉट शेअर करत तिने प्रत्युत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

SCROLL FOR NEXT