Tabu SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tabu : घट्ट मिठी अन् तोंड भरून कौतुक; महेश मांजरेकरांना पुरस्कार देताना तब्बू मराठी भाषेत झाली व्यक्त, पाहा VIDEO

Tabu Spoke Marathi : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा 'फिल्मफेअर मराठी 2025' सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ती मराठी बोलताना दिसत आहे.

Shreya Maskar

नुकताच 'फिल्मफेअर मराठी 2025' (Filmfare Awards Marathi 2025) सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक मोठ्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मराठीसोबत बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

'फिल्मफेअर मराठी 2025' मधील तब्बूच्या देसी लूक आणि मराठमोळ्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'फिल्मफेअर मराठी 2025' सोहळ्यात तब्बू मराठी भाषेत बोलताना दिसली. सोहळ्यात तब्बूने दिग्दर्शक महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांचे आभार मानले. तब्बू (Tabu Spoke Marathi ) मराठीत म्हणाली, "नमस्कार, मी आज खूप खूश आहे. या सन्मानासाठी खूप आभार...मी हा अवॉर्ड अशा दिग्दर्शकाला देत आहे. ज्याने मला माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा आणि महत्त्वाची भूमिका दिली. मांजरेकर..."

स्टेजवर महेश मांजरेकर येताच तब्बू त्यांना मिठी मारते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर महेश मांजरेकर म्हणाले की, "मला ट्रॉफी मिळाल्याचा आनंद तर आहेच पण त्यापेक्षा जास्त आनंद हा पुरस्कार माझी मैत्रीण तब्बूच्या हातून मिळाल्याचा आनंद जास्त आहे. माझ्या मते जगातील बेस्ट अभिनेत्री ही आहे. " त्यानंतर महेश मांजरेकर तब्बूच्या 'अस्तित्व' चित्रपटातील अभिनयाचे कौतुक करतात. शेवटी ते म्हणतात की, "हिच्यासोबत पुन्हा चित्रपटात काम केल्याशिवाय मी मरणार नाही. ट्रॉफीसाठी खूप धन्यवाद..."

तब्बूचा मराठी बोलण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तब्बूच्या मराठीचे सर्वत्र कौतुक करताना दिसत आहेत. तब्बू लवकरच अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Bus Accident: ३० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला डंपर धडकला | VIDEO

Ashish Chanchlani: आशिष चंचलानीने केलं एली अवरामला प्रपोज, पाहा फोटो

Namrata Sambherao : हास्यजत्रेच्या लॉलीने जिंकला Filmfare, पाहा फोटो

Maharashtra Live News Update : कठडे नसलेल्या बंधाऱ्यावरून चारचाकी कोसळली स्थानिकांनी चालकाला वाचवले..

Shocking: प्रेमविवाहाची भयंकर शिक्षा! जोडप्याला नांगराला बांधून शेतात फिरवलं,धक्कादायक VIDEO

SCROLL FOR NEXT