Tabbu Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Viral Video: मिठी मारायला आलेल्या फॅन्ससोबत तब्बूने केली ‘अशी’ कृती की नेटकरी संतापले

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तब्बूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्या कृतीमुळे तब्बू बरीच चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Tabbu Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री तब्बू नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकतीच तब्बू तिच्या आणि अजयचा आगामी चित्रपट ‘भोला’मुळे सोशल मीडियावर बरेच चर्चेचा विषय ठरले. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तिच्या कृतीमुळे ती बरीच चर्चेत आली आहे.

अजय आणि तब्बू ‘भोला’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. महाराष्ट्रासह देशातील मुख्य शहरांमध्ये जाऊन ते, चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. सध्या त्या प्रमोशनमधील तब्बूचं वागणं चाहत्यांना पटलेलं नाही. दिल्लीमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. पण या दरम्यान चाहतीच्या एका कृतीमुळे आणि तब्बूने त्यावर दिलेली प्रतिक्रिया यामुळे ती सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली.

दिल्लीच्या पॅसिफिक मॉलमध्ये तब्बू आणि अजय देवगण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमात प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यानंतर प्रेक्षकांसोबत त्यांनी फोटो सेशन देखील केले. त्यावेळी एक चाहती अजय आणि तब्बूसोबत फोटो काढण्यासाठी आली. तिने अजयला मिठी मारून फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

पण अजयने चिडचिड आणि प्रेमापोटी तसं करत तिच्या सोबत फोटो काढला. मग ती तब्बूकडे गेली. त्या मुलीला तब्बूसोबत मिठी मारलेला फोटो काढायचा होता. पण तिने तसा प्रयत्न करताच तब्बू मागे झाली आणि तिचा हात पकडून तो बाजूला करायला सांगितला. त्यानंतर त्या मुलीने काही अंतर लांब राहून तब्बूबरोबर फोटो काढला.

या कृतीमुळे तब्बू बरीच ट्रोल झाली आहे. तिचे हे कृत्य पाहून नेटकरी म्हणतात, ‘अजयने तिच्यासोबत मिठीमारून फोटो काढला, त्याला काही हरकत नसताना, तुला काय झालं.’ तर आणखी एक नेटकरी म्हणतो, ‘तू खूप उद्धट वागलीस पण, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली म्हणून कोणता इतका attitude आला काय माहित.’ नेटकरी इतक्यावरच थांबले नाही, तिला म्हणतात, ‘स्वतःला काय समजते काय माहित?, चाहत्यांसोबत असं वागायला नको होतं तू.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

SCROLL FOR NEXT