Taapsee Pannu Boyfriend Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taapsee Pannu: तापसी पन्नूसोबत फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?, इंडस्ट्रीत होतेय वेगळीच चर्चा

Taapsee Pannu Boyfriend: तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण तिचा चित्रपट नाही तर ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. तापसी पन्नू सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तापसीसोबत एक व्यक्ती दिसत आहे.

Priya More

Taapsee Pannu And Mathias Boe:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तापसी पन्नू नेहमी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षामध्ये देखील स्पष्टपणे आपली मतं मांडत असते. 'डिंकी' चित्रपट रिलीज झाल्यापासून तापसी पन्नू चर्चेत आहे. चित्रपटातील तापसीच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये देखील चांगली कमाई केली. आता तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण तिचा चित्रपट नाही तर ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे.

तापसी पन्नू सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तापसीसोबत एक व्यक्ती दिसत आहे. अभिनेत्री या व्यक्तीच्या खूप जवळ दिसते. हे पाहिल्यानंतर चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की ही व्यक्ती कोण आहे? हा तापसीचा बॉयफ्रेंड (Taapsee Pannu Boyfriend) असल्याचे बोलले जात आहे. पण नक्की ही व्यक्ती कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत...

तापसीचा एक फोटो व्हायरल झाला होता या फोटोमध्ये तापसी निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. ती एका व्यक्तीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये दिसणारी ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तापसीचा बॉयफ्रेंड आहे. तापसी या परदेशी व्यक्तीला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. तापसीच्या बॉयफ्रेंडचे नाव मॅथियास बोये आहे. तापसी अनेक वर्षांपासून मॅथियासला डेट करत आहे. मॅथियासचा बॉलिवूड किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. तो क्रीडा क्षेत्रातून येतो आणि तो एक डॅनिश बॅडमिंटनपटू आहे. सध्या मथियास भारतात राहतो. तो भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन टीमचा कोच आहे.

मॅथियासने ऑलिम्पिकमध्ये अनेक पदकं जिंकली आहेत. डेन्मार्ककडून खेळताना मॅथियासने अनेक पदके जिंकली आहेत. मॅथियासने २०१२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तो २०२० मध्ये रिटायर्ड झाला. यानंतर भारतीय खेळाडूंच्या विनंतीवरून त्याला भारतीय दुहेरी संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले.

दरम्यान, तापसी आणि मथियास अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. जरी तापसी पन्नू तिच्या नात्याबद्दल फारशी बोलत नसली तरी मॅथियासने तापसीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एकत्र घालवलेल्या सुट्टीचे अनेक फोटो आहेत. तापसीने नववर्षाचे स्वागत देखील मॅथियाससोबतच केले होते. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT