Sushmita Sen Swim In Hot Pool Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen: -1 डिग्री सेल्सिअस तापमान..., सुष्मिता सेनने स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारत लावली आग, VIDEO व्हायरल

Sushmita Sen Viral Video: सुष्मिता सेनने तिच्या नवीन वर्षाची सुरुवात अझरबैजानमधून केली. याठिकाणी ती सुट्ट्या इन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी सुष्मिता सेन -1 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

Priya More

Sushmita Sen Swim In Hot Pool Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या तिच्या आगामी अॅक्शन-थ्रिलर सीरिज 'आर्या'च्या तिसऱ्या सीझनमुळे चांगलीच चर्चेत आहेत. सुष्मिताचे चाहते तिच्या या बेवसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही वेबसीरिज रिलीज होण्यापूर्वी सुष्मिता सेनचा एक हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सुष्मिता सेन सुट्ट्या इन्जॉय करत आहे. सुष्मिता सेनने तिच्या नवीन वर्षाची सुरुवात अझरबैजानमधून केली. याठिकाणी ती सुट्ट्या इन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी सुष्मिता सेन -1 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. सुष्मिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुष्मिता सेनने तिच्या नवीन वर्षाची सुरुवात अझरबैजानमधून केली. याठिकाणी तिने खूपच धम्माल केली. ज्याचा एक व्हिडिओ सुष्मिताने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडीओची सुरुवात एखाद्या चित्रपटामध्ये दिसणाऱ्या दृश्यांसारखी होते. यामध्ये सुरुवातीला एक स्विमिंग पूल आणि नंतर बर्फाच्छादित पर्वत रांगा दिसत आहेत. त्यानंतर व्हिडिओमध्ये स्विमिंग पूल दिसतो. सुष्मिता सेन हॉट वॉटर स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारत पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या स्विमिंग कॉस्च्युममध्ये सुष्मिता सेन जेव्हा पाण्यातून बाहेर येते तेव्हा तिचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत.

सुष्मिता स्विमिंग पूलमध्ये पोहत असते त्यावेळी तिथले तापमान हे -1 डिग्री सेल्सिअस असते. सुष्मिता सेनने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बर्फाने झाकलेले पर्वत, - 1 डिग्री तापमान, एक गरम पाण्याचा स्विमिंग पूल आणि त्यात उडी मारण्याची इच्छा... उफ काय अनुभव आहे... मुक्त आणि निसर्गासोबत राहण्याचा.' सुष्मिता सेनचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. चाहत्यांकडून या व्हिडीओला चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहते तिचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नुकताच सुष्मिता सेन दिसली होती. यावेळी ती मुलगी आणि बॉयफ्रेंड रोहमनसोबत दिसली. यावेळी सुष्मिताने काळ्या रंगाचा आउटफिट घातला होता ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. सुष्मिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सुष्मिता शेवटी 'आर्या' वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिची ही वेबसीरिज प्रेक्षकांना खूप आवडली. आर्यानंतर ती 'आर्या 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता प्रेक्षक तिच्या 'आर्या 3' ची वाट पाहत आहेत. ही वेब सीरिज पुढच्या महिन्यात 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT