Lalit Modi and Sushmita Sen dating saam tv
मनोरंजन बातम्या

ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपवर पहिल्यांदाच बोलली सुष्मिता सेन; म्हणाली, बस्स झालं आता...

ललित मोदी यांच्या डोक्यात २००८ रोजी एक भन्नाट कल्पना आली, त्यानंतर...

नरेश शेंडे

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं समीकरण खऱ्या अर्थाने जुळलं ते (Indian Premier League) इंडियन प्रिमियर लीगच्या माध्यमातून. ललीत मोदी यांच्या डोक्यात २००८ रोजी एक भन्नाट कल्पना आली आणि आयपीएलच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली. याच आयपीएल दरम्यान ललीत मोदींच्या (Lalit Modi) नावाची तुफान चर्चा झाली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून वैयक्तीक आयुष्यातील घडामोडींवर पडदा टाकणाऱ्या मोदींनी काल मात्र (lalit modi Instagram post) इन्स्टाग्रामच्या एका पोस्टद्वारे सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मोदींनी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबतचे (Sushmita Sen) डेटिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर मोदी-सेन जो़डी लवकरच विवाहबंधनात अडकणार ? अशा चर्चांना उधाण आलं. या दोघांच्या लग्नाचा संस्पेंस वाढत असतानाच सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम लावला.

काय म्हणाली सुष्मिता सेन ?

सोशल मीडियावर ललीत मोदी आणि सुष्मिता सेने यांचे रोमॅन्टिक फोटो झळकल्यानंतर मोदी-सेन जोडी लवकरच लग्नबंधणात अडकणार, अशा चर्चा रंगू लागल्या. परंतु, सुष्मिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन म्हटलं की, मी खूष आहे. ना आमचं लग्न झालंय, ना आमचा साखरपुडा झालाय...मी अशा प्रेमात अडकली आहे, जिथे कोणत्याही अटी-शर्थी नाहीत. खूप झालं स्पष्टीकरण, आता पुन्हा काम सुरु करुन जीवनात परत यायचंय.

दोघांच्या प्रेम प्रकरणावर प्रतिक्रियांचा वर्षाव

ललीत मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या प्रेमप्रकरणावर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यासाठी तिने खूष राहावं. प्रेम सुंदर आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की, तिने कोणाला तरी पसंत केलं आहे.ते त्यांच्या लायक आहेत, असं रोहमन म्हणाला आहे. तसंच सुष्मिताचा भाऊ राजीव सेननेही यावर टीप्पणी केली आहे.

मला या रिलेशनशीपबाबत कळलं, तेव्हा आश्चर्य वाटलं. याबाबत मी सुष्मितासोबत बोलणार आहे, असं राजीवनं म्हटलं आहे. तसेच मोदींचा मुलगा रुचिर मोदीनेही प्रतिक्रिया दिली आहे. मी कुटुंबातील वैयक्तीक टीप्पणी करण्यापासून दूर राहतो. मात्र, व्यवसायीक आणि इतर महत्वाच्या प्रकरणांवर प्रतिक्रिया द्यायला मला नेहमी आवडेल. ते त्यांचं आयुष्य आहे आणि निर्णय आहे, असं रुचिरने माध्यमांशी बोलताना म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT