Sushmita Sen And Rohman Shawl Relation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen Wedding: सुष्मिता सेन वयाच्या ४८ व्या वर्षी १५ वर्ष लहान रोहमनसोबत बांधणार लगीनगाठ?; लग्नाच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं

Sushmita Sen And Rohman Shawl Wedding: सुष्मिता सेन सध्या 'आर्या ३'मुळे खूपच चर्चेत आली आहे. नुकतंच तिने एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Sushmita Sen And Rohman Shawl Relation

'ताली', 'आर्या ३' वेबसीरीजमुळे चर्चेत राहिलेली सुष्मिता सेन सध्या खासगी आयुष्यात लाईमलाईटमध्ये आली आहे. सध्या सुष्मिता 'आर्या ३' वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच 'आर्या ३'निमित्त सुष्मिताने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. अनेकदा सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत एकत्रित स्पॉट झाली आहे. दोघांचेही रोमँटिक फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Bollywood)

सुष्मिता सेननं नुकतंच 'फिल्म कंपेनियन' या वेब पोर्टलला एक मुलाखत दिली. सुष्मिता म्हणते, "मी किमान वयाच्या या टप्प्यावर तरी सेटल होण्याचा विचार करावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे, हे मला ठाऊक आहे. मला कोणत्याही गोष्टीची परवा नाही. माझा लग्नसंस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे, मी त्यावर प्रेमही करते. मी त्याचा सन्मानही करते. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या कपल्सला ओळखते. माझ्यासमोरच ‘आर्या’ वेब सीरिजचे दिग्दर्शक राम माधवानी आणि निर्माती अमिता माधवानी यांचं उत्तम उदाहरण आहे." (Bollywood News)

"ते कपल कायमच सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. पण माझा लग्नापेक्षा मैत्रीवर विश्वास आहे आणि कोणत्याही नात्यात मैत्री असते. जर तुमच्या मैत्रितलं नातं खूप चांगलं असेल तर कोणत्याही गोष्टीची परवा करण्याची गरज नाही. मग इतरत्र गोष्टीही आपोआप घडतात. आपल्या नात्यामध्ये स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे." असं म्हणत अभिनेत्रीने आपलं मत स्पष्ट केलंय. (Bollywood Actress)

सुष्मिता सेनच्या लव्हलाईफबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री आपल्या सिनेकारकिर्दिमुळे नाही तर तिच्या लव्हलाईफमुळेच खूप लाईमलाईटमध्ये आली. सुष्मिता आणि रोहमनचं रिलेशन २०१८ पासूनचं आहे. त्यांच्यातील रिलेशनबद्दल २०१८ मध्ये चाहत्यांना माहिती दिली. त्यानंतर २ वर्षांनंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अभिनेत्रीचं ललित मोदीसोबत रिलेशन सुरू झालं. त्यांचे अनेक रोमँटिक फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुष्मिता आणि रोहमन ब्रेकअपनंतर पुन्हा २ वर्षानंतर रिलेशनमध्ये आले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT