Surveen Chawla Saam Tv
मनोरंजन बातम्या

Surveen Chawla: बाय म्हणताच खाली वाकला अन् किस करत..., बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कास्टिंग काउचची शिकार

Surveen Chawla Shocking News: बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. एका डायरेक्टरने सुरवीनला चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी बोलावलं आणि तिला किस केलं. एका मुलाखतीत तिने हा अनुभव शेअर केला.

Priya More

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या प्रभावी आणि दमदार भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सुरवीन चावलाने नुकताच एका मुलाखतीमध्ये अस्वस्थ करणारी गोष्ट सांगितली. सुरवीन चावला देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे कास्टिंग काउचची शिकार झाली. तिने आपल्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'क्रिमिनल जस्टिस ४' या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये हा अनुभव अतिशय परखडपणे शेअर केला. एका डायरेक्टरने तिला मिटिंगदरम्यान किस केल्याचे तिने सांगितले.

सुरवीनने कास्टिंग काउचचा अनुभवही शेअर करताना सांगितले की, 'मुंबईतील वीरा देसाई रोडवर ही घटना झाली. माझी एका डायरेक्टरसोबत मिटिंग झाली. आमच्यात व्यावसायिक गप्पा झाल्या, मी त्यांना माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं कारण त्यावेळी माझे लग्न झालं होते. आमची मिटिंग संपल्यानंतर मी तिथून निघून जात होते तेव्हा तो डायरेक्टर मला गेटवर सोडण्यासाठी आला. मी गुडबाय बोलताच तो खाली वाकला आणि त्याने मला किस करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला ढकलून दूर केले आणि तिथून निघून गेले.'

सुरवीनने पुढे सांगितले की, 'काही लोकं असं गृहीत धरतात की काम मिळवण्यासाठी हे सर्व सहन करावे लागते. पण हे खूपच चुकीचे आहे. इंडस्ट्रीत होणाऱ्या या शोषणाविरोधात उघडपणे बोलण्याची वेळ आता आली आहे. मुलींनी धाडसाने काम करावे आणि अशा लोकांचा पर्दाफाश करावा. त्यांची नावे कितीही मोठी असली तरीसुद्धा उघडपणे बोलावे.'

सुरवीनने सांगितले की, एकदा साऊथ इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला त्याच्यासोबत झोपायला सांगितले होते. त्या दिग्दर्शकाला हिंदी किंवा इंग्रजी येत नव्हती. म्हणून त्याने हे मला तिसऱ्या व्यक्तीमार्फत कळवले होते. जेव्हा सुरवीनने टेलिव्हिजनवरून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा तिला तिच्या लूक आणि शरीरयष्टीवरून खूप अपमानास्पद बोलण्यात आले होते. तो अनुभव सांगताना सुरवीन म्हणाली की, मला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या मिटिंगवेळी माझे वजन, कंबर आणि छातीच्या आकाराबद्दल प्रश्न विचारले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT