Sunny Leone  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone: बॉलिवूडच्या सनी लियोनीला मराठमोळ्या गाण्याची भुरळ, 'कन्नी'तल्या 'नवरोबा'वर केला अफलातून डान्स

Sunny Leone Dance On Navroba Song: कन्नी चित्रपटातील 'नवरोबा'हे गाणं रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. हे गाणं सध्या युट्यूबवर धुमाकूळ घातल आहे. या गाण्याचे रील्स देखील व्हायरल होत आहेत. अशामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) देखील कन्नीमधील 'नवरोबा' या गाण्याची भुरळ पडली आहे.

Priya More

Sunny Leone Dance Video:

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) यांच्या आगामी 'कन्नी' चित्रपटाची (Kanni Film) सगळीकडे चर्चा होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगाल प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील 'नवरोबा'हे गाणं रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. हे गाणं सध्या युट्यूबवर धुमाकूळ घातल आहे. या गाण्याचे रील्स देखील व्हायरल होत आहेत. अशामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) देखील कन्नीमधील 'नवरोबा' या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावर सनीने जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या या डान्सचा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असून सगळ्याच गाण्यांवर प्रेक्षक प्रेम करत आहेत. यातील विशेष गाजलेले गाणं म्हणजे 'नवरोबा'. या गाण्यावरील हूकस्टेपही प्रचंड गाजत आहे. या गाण्याची भुरळ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीला पडली आहे. 'नवरोबा' गाण्यावर सनीने अफलातून डान्स केला आहे. तिच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

नवरोबा गाण्यावर डान्स करताना सनी लिओनीने खूप इन्जॉय केले आहे. सनी कलरफूल शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. मोकळे केस, डोक्यावर टोपी आणि ब्लॅक कलरचे शूज कॅरी करत सनीने लूक परिपूर्ण केला आहे. सनीने या गाण्यावर जबरदस्त डान्स स्टेप केल्या आहेत. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांनी पसंती दिली असून कमेंट्समध्ये फायर इमोजी पोस्ट केले आहेत. या पोस्टद्वारे सनीने कन्नीच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, समीर जोशी लिखित, दिग्दर्शित ‘कन्नी’ चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT