Sonam Kapoor Instagram
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor Weight Loss: वजन कमी करण्यासाठी मी..., सोनम कपूरने सांगितला आई झाल्यानंतरचा तिचा १६ महिन्यांचा प्रवास

Sonam Kapoor Fitness: नुकताच सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सोनमने तिच्या फोटोसोबत एक इमोशनल नोटही लिहिली आहे. त्याचसोबत तिने वजन कसे कमी केले हे सांगितले आहे.

Priya More

Sonam Kapoor Insta Post:

बॉलिवूडमध्ये (Bollywood) 'स्टाईल आयकॉन' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या चित्रपटांपासून दूर आहे. बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केल्यानंतर आणि मुलगा वायूच्या जन्मानंतर सोनम आपला वेळ बहुतेक वेळ लंडनमध्ये घालवते. आई झाल्यानंतर सोनम कपूर सध्या मातृत्वाचा आनंद घेत असून मुलगा वायूसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

पण सोनम कपूर सोशल मीडियावर सक्रीय राहून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती नेहमी नवनवीन फोटोशूट आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्याचसोबत तिच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सोनमने तिच्या फोटोसोबत एक इमोशनल नोटही लिहिली आहे. त्याचसोबत तिने वजन कसे कमी केले हे सांगितले आहे.

सोनम कपूरने ऑगस्ट २०२२ मध्ये मुलगा वायुला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर सोनमच्या शरीरात अनेक बदल झाले होते. सोनम कपूर खूपच जाड देखील झाली होती. पण आता सोनम कपूर हळूहळू आपले वजन कमी करत आहे. नुकताच केलेल्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये सोनमने याच बदलांचा उल्लेख केला आहे. सोनमने या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील 16 महिने चढ-उतारांनी भरलेले आहेत. या 16 महिन्यांत मी स्वत:ला वेळ दिला. माझ्या मुलाची काळजी घेतली आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ दिले. आता मी स्वतःला पूर्वीसारखे अनुभवण्यास सक्षम आहे.'

सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वजन कमी करण्यासाठी मी कोणतेही क्रॅश डाएट किंवा क्रेझी जिम केले नाही. माझे वजन अजूनही पूर्वीसारखे कमी झालेले नाही. परंतु मी लवकरच माझ्या जुन्या आकारामध्ये परत येईन. यासाठी मी माझ्या शरीराची खूप आभारी आहे. पण हा शरीर बदल खूपच अविश्वसनीय आहे. स्त्री असणे ही एक विलक्षण गोष्ट आहे. ' सोनम कपूरचे आई झाल्यानंतरच्या प्रवासाबद्दल असे खुलेपणाने बोलणे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. ते तिच्या या पोस्टला लाइक्स करत तिच्या नव्या लूकचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट करत तिच्या पतीच्या आजाराची माहिती देणारी एक नोट शेअर केली होती. त्या नोटमध्ये सोनमने लिहिले होते की, 'गेले वर्ष चढ-उतारांनी भरलेली होती. 2023 मध्ये माझे पती खूप आजारी पडले. त्याचे काय झाले हे डॉक्टरांना कळू शकले नाही. ते तीन महिने माझ्यासाठी नरकासारखे होते. पण देवाच्या कृपेने आणि डॉ. सरीन यांच्या मेहनतीने ते बरे झाले आहेत. आनंद आता पूर्णपणे बरा झाला आहे.' सध्या सोनम लंडनमध्ये तिच्या पतीसोबत राहत आहे आणि मुलगा वायुसोबत वेळ घालवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT