Sonakshi Sinha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha: बॉलिवूडची दबंग गर्ल बॉयफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात; तारीख आली समोर

Sonakshi Sinha About To Get Married: बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हाला ओळखले जाते. सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चर्चेत आहे. हिरामंडी या वेबसीरीजमध्ये सोनाक्षीने उत्तम भूमिका साकारली आहे. सोनाक्षी सिन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न करणार आहे. सोनाक्षी तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. सोनाक्षी सिन्हा जून महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार २३ जून रोजी सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीरसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. सोनाक्षीने लग्न हे खाजगी असणार आहे. या लग्नाला दोन्ही कुटुंब, जवळचे मित्र- मैत्रिण उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत हा सोहळा पार पडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

गेली अनेक वर्ष सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. झहीर हा फिटनेस ट्रेनर आहे. हे दोघे अनेकदा पापाराझींसमोर एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, याबाबत दोघांनीही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सोनाक्षी आणि झहीर यांची भेट सलमान खानच्या एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.सोनाक्षी आणि झहीरने डबल एक्सएल या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यानंतरच त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav Khanna : "दिल हमेशा कुर्बान होता है..."; बिग बॉस विजेता गौरव खन्ना अन् आकांक्षा चमोला यांचा 9 वर्षांचा संसार मोडला?

Ajit Pawar funeral: अजितदादा परत या...कार्यकर्त्यांचा बारामतीत हंबरडा, जनसागर लोटला, डोळ्यात अश्रूंच्या धारा!

आता ATM मधून मिळणार १०,२० आणि ५० रुपयांच्या नोटा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT