Sonakshi Sinha New Home Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha New Home: ‘दबंग गर्ल’चं नवं घर ५ स्टार हॉटेललाही देतेय टक्कर, घराचे Inside Photo पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

Sonakshi Sinha News: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने चाहत्यांसोबत आपल्या घराची खास झलक शेअर केली आहे.

Chetan Bodke

Sonakshi Sinha New Home Photos

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress Sonakshi Sinha) कायमच आपल्या रिल लाईफमध्येही आणि रियल लाईफमध्येही ती चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केलं होतं. अभिनेत्रीने हे नवीन घर वांद्र्यामध्ये सीफेस जवळ असलेल्या आलिशान बिल्डिंगमध्ये हे घर खरेदी केलं होतं. नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत आपल्या घराची खास झलक शेअर केली आहे.

नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने संपूर्ण घराची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत लिव्हिंग रूमपासून ते मास्टर बेडरूमपर्यंत सर्वच घर दाखवलेलं आहे. अभिनेत्रीचं हे नवं घर पाहून चाहते अवाक झाले असून सध्या तिच्या नव्या घराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या इंटिरियर डिझायनरचेही तिने आभार मानले.

सोनाक्षी आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, “धन्यवाद, माझ्या स्वप्नातले घर प्रत्यक्षात आणल्याबद्दल राजीव पारेख, एकता पारेख आणि रेड आर्किटेक्चर तुमचे मनापासून आभार...” सोनाक्षीने मुंबईतल्या वांद्रे येथील हायराइज अपार्टमेंटमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. सोनाक्षीचं हे नवीन घर २६ व्या मजल्यावर असून तिचं हे नवं घर सीफेस आहे. तिच्या नव्या घराची किंमत ११ कोटी असून तिने मे २०२३ मध्ये एक लग्झरी अपार्टमेंट खरेदी केले होते. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

सोनाक्षी सिन्हाचे वांद्रे पश्चिममधील नवं घर ४ हजार स्क्वेअर फुटचं असून त्यात चार मास्टर बेडरूम आहेत. दिवाणखान्यासोबतच तिच्या घरामध्ये आर्ट स्टुडिओ, योगा एरिया, ड्रेसिंग रूम, वॉक इन वॉर्डरोब आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या नवीन घरातील लिव्हिंग रूम अतिशय आलिशान आहे. सोबतच तिच्या नव्या घरातील वस्तूंनीही सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या अभिनेत्रीच्या या नव्या घराची प्रचंड चर्चा होत आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनाक्षी रितेशच्या ‘काकुडा’, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT