Shraddha Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor : 'बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रेमळ हृदयाची...'श्रद्धाच्या एका कृतीने चाहते भारावले, पाहा VIDEO

Shraddha Kapoor Viral Video : बॉलिवूडची क्विन श्रद्धा कपूर नेहमीच आपल्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची 'स्त्री' कायमच आपल्या खास अंदाजाने चाहत्यांच्या मनात घर करत असते. अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या 'स्त्री 2' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक चाहते तिच्या स्वभावावर घायाळ होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी श्रद्धावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रद्धा एका कार्यक्रमाला गेलेली असताना एक महिला तिला केक भरवत आहे. तेव्हा श्रद्धा त्यातील थोडा केक घेते आणि बाकीचा त्या महिलेला भरवते. तसेच शेवटी ती हात जोडून त्या महिलेला थँक्यू देखील बोलते. तसेच जाताना ती या महिलेची गळाभेटही घेते. हे पाहून सर्वच भारावून गेले आहेत. श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

श्रद्धाच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहे. श्रद्धाच्या समजूतदारपणाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिलं की, "बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रेमळ हृदयाची मुलगी, कायम पाय जमिनीवर" अशा अनेक कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर येत आहे. श्रद्धाच्या संस्कारांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे 93.8 मिलियन इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. तिला नेहमीच चाहत्यांकडून प्रेम मिळत असते. श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. श्रद्धा कपूरच्या नवीन प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT