Shilpa Shetty Yoga Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty ने अशी केली नववर्षाची सुरूवात, VIDEO शेअर करत चाहत्यांना दिल्या फिटनेस टिप्स

Shilpa Shetty Fitness Tips For Fans: आपल्या आयु्ष्यामध्ये फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या शिल्पा शेट्टीने नववर्षाची सुरूवात खास पद्धतीने केली आहे. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ (Shilpa Shetty Yoga Video) सध्या व्हायरल होत आहे

Priya More

Shilpa Shetty Yoga Video:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) 'फिटनेस क्वीन' देखील म्हटले जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी शिल्पा शेट्टी चाहत्यांना फिटनेसचे धडे आणि डाएटबद्दल सांगत असते. नेहमी योगासन आणि जिममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ ती शेअर करत असते. आपल्या आयु्ष्यामध्ये फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या शिल्पा शेट्टीने नववर्षाची सुरूवात खास पद्धतीने केली आहे. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ (Shilpa Shetty Yoga Video) सध्या व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीचे नाव बॉलवूडच्या टॉप फिट अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. शिल्पा शेट्टीच्या फिटनेसला सर्वांकडून खूप चांगली पसंती मिळते. ऐवढंच नाही तर तिच्या फिटनेस टिप्स अनेक जण फॉलो देखील करतात. शिल्पा शेट्टी फिटनेससाठी दररोज तासंतास मेहनत करते. नुकताच शिल्पाने तिच्या फिटनेसचे रहस्य एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवले आहे. शिल्पा शेट्टीने योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या माध्यमातूनच तिने नववर्षाची सुरूवात केली आहे.

शिल्पा शेट्टी फिटनेसबाबत आपल्या चाहत्यांना नेहमी जागरूक करत असते. ती अनेकदा वेगवेगळ्या योगासनचांची चाहत्यांना माहिती देत असते आणि त्याचे व्हिडीओ देखील शेअर करते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती बॅलेंसिंग आसनाची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या व्हिडीओद्वारे ती चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला देत आहे.

शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी 2024 ची सुरुवात Ashwa Sanchalana Salamba Utthita Eka Padasana या 'बॅलेन्स' नोटवर करत आहे. जे एक उत्तम संतुलित आसन आहे. हे लक्ष आणि एकाग्रता सुधारण्यात मदत करते. त्याचसोबत मन आणि शरीर यांच्यातील समन्वय वाढवते. पाठदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी हे आसन खूपच फायदेशीर आहे. '

तसंच, 'पण कृपया लक्षात ठेवा की, ज्यांना पाठदुखी किंवा स्लिप-डिस्कचा त्रास आहे आणि गर्भवती महिलांनी हे आसन करणे टाळावे. तुम्हा सर्वांना नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो... 2024 साठी माझा संकल्प आहे जागरूकता, समतोल आणि कृतज्ञतेने जगण्याचा.' यासोबतच शिल्पाने आपल्या चाहत्यांना तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे?, असा देखील प्रश्न विचारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT