Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या थेट घशात अडकली 'नोज रिंग'; त्यानंतर काय घडलं? VIDEO होतोय व्हायरल

Bollywood Actress Accident : प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शूटिंग दरम्यान भयंकर घटना घडली. सेटवर शूटिंग करताना 'नोज रिंग' घशात अडकली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घशात 'नोज रिंग' अडकली

शूटिंग दरम्यान घडली दुर्घटना

व्हिडीओ पाहून चाहतेही घाबरले

'बिग बॉस १३' मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या आपल्या कामामुळे चांगलीच चर्चेत आहे. ती एकावर एक दमदार प्रोजेक्ट देत आहे. अभिनेत्रीने नुकताच तिच्यासोबत घडलेल्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत तिने सांगितले की, एका शूटिंगदरम्यान तिची नथ चुकून तिच्या तोंडात पडली आणि ती गिळली गेली. अभिनेत्रीने पडद्यामागचा (BTS) एक व्हिडिओ शेअर केला.

शहनाज गिलने शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत पडले आहे. एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान शहनाज गिलसोबत ही भीतीदायक घटना घडली.व्हिडिओमध्ये अभिनेत्री सेटवर धावताना दिसत आहे, तेव्हाच तिची नथ अचानक तिच्या तोंडात पडते. त्यानंतर अभिनेता सौरभ सचदेवा तिला मदत करण्यासाठी धावताना दिसतो, तिच्या पाठीवर थोपटतो. व्हिडिओमध्ये शहनाज ओरडताना आणि उलटी करण्याचा प्रयत्न करतानाही ऐकू येते.

शहनाजने शेअर केलेल्या क्लिपवरून असे दिसते की, ही घटना तिच्या आगामी प्रोजेक्टपैकी एकाच्या शूटिंगदरम्यान घडली असावी. असे असूनही, शहनाज गिलने शूटिंग सुरूच ठेवले. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, "मुख्य व्हिडिओच्या आधी... ही एक छोटी BTS कथा...तुमच्यापैकी बरेच जण मला नथीची घटना पोस्ट करायला सांगत होते!" चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्रीबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

शहनाज गिलही मनोरंजन विश्वातील आता प्रसिद्ध चेहरा आहे. तिने सलमान खानसोबत देखील काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शहनाज गिलने 'इक कुडी' चित्रपटातून निर्माती क्षेत्रात पदार्पण केले. तसेच ती 'किसी का भाई किसी की जान', 'थँक्यू फॉर कमिंग', 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटांमध्ये दिसली. शहनाज गिलने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. चाहते आता शहनाज गिलच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्याअंतर्गत पहिल्या गुन्हाची नोंद

High cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करायचंय मग औषधं सोडा; दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखी वितळेल रक्तवाहिन्यंमधील चरबी

Leg cramps: पायात अचानक क्रॅम्प्स का येतात? ही असू शकतात कारणं

मुंबईत खळबळ! माजी नगरसेविकेच्या मुलाला धक्कादायक प्रकरणात अटक; झडती घेताच पोलिसांचेही डोळे पांढरे

Wadala Tourism : पावसाळ्यात वडाळा दिसतोय इतका सुंदर की तुम्ही पाहतच राहाल, आताच नोट करा पिकनिक स्पॉट्सची नावे

SCROLL FOR NEXT