Kartik Aryan And Sara Ali Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan: साराने दिल्या एक्स बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ब्रेकअपनंतर पहिल्यांदा म्हणाली…

साराने तिच्या एक्स बॉयफ्रेंड कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या स्टार कपलची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sara- Kartik: आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या आयुष्यात काय घडतंय? याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते. आवडत्या अभिनेत्याचे अथवा अभिनेत्रीचे कोणासोबत सूत जुळत आहे ? याची सर्वांनाच आतूरता असते. बॉलिवूडमधील बरेच अभिनेता आणि अभिनेत्रींची अशी जोडी आहे, जे काही काळापासून रिलेशनशिप मध्ये आहेत. त्यांचे कधी ब्रेकअप होते किंवा त्यांचे कधी पुन्हा एकदा प्रेम होते, याची ही चाहत्यांना फार उत्सुकता असते.

अशीच एक जोडी म्हणजे सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची. ज्याच्या प्रेमाची अप्रतिम सुरुवात झाली होती. पण त्यांच्या नात्यात कसा दुरावा आल्याचे कारण कोणालाच माहित नाही. खुलेपणाने प्रेम व्यक्त करणारी ही जोडी आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.कार्तिक आर्यनने नुकताच त्याचा 32 वा वाढदिवस साजरा केला.

यावेळी सारानेही तिचा एक्स बॉयफ्रेंड कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या स्टार कपलची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. साराने कार्तिकचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कार्तिकसाठी लिहिले की,'कार्तिक तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा आहे की तुझे हे वर्ष देखील तुझ्या अपेक्षेप्रमाणे जाईल आणि तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील.'

Kartik Aryan

अजूनही कार्तिकची यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण याला कार्तिक नक्कीच उत्तर देईल अशी आशा चाहत्यांना आहे. दोघांनीही एकमेकांना जोडीदार म्हणून निवड केली होती. साराने करण जोहरच्या शोमध्ये कार्तिक आर्यनला जोडीदार म्हणून निवड केली होती. कॉफी विथ करणपासून या दोघांच्याही नात्यांवर चर्चा व्हायला लागली. त्यानंतर ही जोडी लव्ह आज कल या चित्रपटमध्ये एकत्र दिसली होती. या चित्रपटानंतरच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी खास कमाई करु शकला नाही.

एक काळ असा होता की, कार्तिक आपली सगळी कामं सोडून साराच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचा. साराच्या भावासोबत कार्तिकही दिसला होता. पण आता दोघेही पूर्णपणे विभक्त झाले आहेत. त्यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, दोन्ही स्टार्स त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. सारा लवकरच 'ए वतन'मध्ये दिसणार असून चित्रपटाची कथा 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calorie Burning Workouts: वजन घटवण्यासाठी किती वेगाने चाललं पाहिजे? जाणून घ्या कॅलरी लॉसचं संपूर्ण गणित

Plane Crash: एअरपोर्टवर अपघाताचा थरार! लँडिंगनंतर विमानाची दुसऱ्या विमानाला धडक; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Classical Singer Death: दसऱ्याच्या दिवशी संगीतविश्वात शोककळा; प्रसिद्ध शास्त्रीय गायक काळाच्या पडद्याआड

'Jolly LLB 3'चा डंका! 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, अक्षय कुमार -अर्शद वारसीची जोडी सुपरहिट

Alia Bhatt: केसरिया तेरा इश्क है पिया...

SCROLL FOR NEXT