Sara Ali Khan Travel In Metro Instagram
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan Travel In Metro: मुंबईच्या लाईफलाईनमध्ये साराने घेतला प्रवासाचा आनंद; ‘मुंबई मेरी जान’ म्हणत वेधले युजर्सचे लक्ष...

नेहमीच अलिशान कारमध्ये फिरणारी सारा काल मेट्रोमधून फिरली, सध्या तिचा मेट्रो प्रवास बरा चर्चेचा विषय ठरला.

Chetan Bodke

Sara Ali Khan Travel In Metro: आपला आवडत्या सेलिब्रिटीला चाहते नेहमीच फॉलो करत असतात. आवडत्या सेलिब्रिटीचे डेली रूटिन फॉलो करत त्यांचा पाठलाग करण्याचा देखील अनेक चाहते प्रयत्न करतात. सोशल मीडियावर सारा अली खान नेहमीच सक्रिय असते. सारा आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच कनेक्ट असते. गेल्या काही दिवसांपुर्वी साराने आणि तिच्या टीमने एकत्र मुंबई लोकलचा प्रवास केला होता. सध्या पुन्हा एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. चर्चेत राहण्याचे कारण, सध्या तिने मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास केला आहे. (Bollywood Actress)

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओत तिने आपली अलिशान लक्झरी कार मधून प्रवास न करता थेट मेट्रोमधून प्रवास केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहे. अचानक सामान्य माणसाच्या गऱ्हाळ्यात कधी नव्हत सेलिब्रिटी दिसल्यावर अनेकांना थोडा वेळासाठी का होईना सुखद धक्का बसतोच. असंच असाच काहीसा किस्सा मुंबईतल्या मेट्रोतमध्ये दिसला. (Bollywood Film)

यावेळी साराने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची प्रिंटेड कुर्ती घालून प्रवास करताना स्पॉट झाली. यावेळी तिने सोशल मीडियावर ‘मुंबई मेरी जान’ म्हणत पोस्ट शेअर केली. माहितीसाठी सांगतो, सारा सध्या तिच्या अपकमिंग चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती सध्या ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचे शूटिंग या वर्षी जानेवारी महिन्यातच सुरू झाले. तिच्या सोबत चित्रपटात आदित्य रॉय कपूर झळकणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासु करत आहे. (Entertainment News)

Sara Ali Khan Post

चित्रपटात प्रमुख भूमिकेत सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर सोबत, अनुपम खेर, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, नीता गुप्ता, पंकज त्रिपाठी आणि अली फाजल हे कलाकार झळकणार आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासु आणि तानी बासु यांनी केले आहे. ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट यावर्षी ८ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. साराचा अखेरचा चित्रपट ‘गॅसलाईट’ ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish- Genelia Deshmukh: रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या लग्नाचे खास फोटो

Local Body Polls 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

MHADA Scheme : स्वस्त घराची संधी! ३१ ऑगस्टपर्यंत म्हाडा घरांसाठी अर्ज करा, सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मोटरसायकल चोर पोलीस स्थानकातून फरार

Pune News: पुण्यात कोयता गँगचा उच्छाद, बाईकवरुन उतरताच दुकानं फोडली; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT