Vicky And Sara Angry Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Vicky And Sara Angry Viral Video: साराने सर्वांसमोर चिडून मारली विकीला लाथ, विकीनं असं नेमकं काय केलं? Video Viral

विकी कौशल आणि सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

Chetan Bodke

Vicky And Sara Viral Video: विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हे दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतीच त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली आहे. त्यांच्या तेथील मस्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साराने त्यांच्या मस्तीचा व्हिडिओ तिच्या अकाऊंटवर शेअर केला आहे.

साराने शेअर केलेल्या या व्हिडीओत, त्यांच्या पाठीमागे ‘द कपिल शर्मा शो’ चा सेट दिसत आहे. त्या सेटवर त्यांनी हा रील शेअर केला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी या शो मध्ये हजेरी लावली होती. त्यांनी ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ या गाण्यावर रील बनवली आहे. त्यात विकीने सारासोबत असं काही कृत्य केलं, ते पाहून तिने थेट त्याला लाथ मारली आहे.

सारा आणि विकी ‘द कपिल शर्मा शो’ या शो मध्ये प्रमोशनसाठी आले असताना, त्यांचा सेटवरील धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ या गाण्यावर दोघांनी ही रोमँटिक डान्स केला असून तो सर्वांनाच आवडला आहे. व्हिडीओत, विकी साराला बाजूला सारून सेटवर उभ्या केलेल्या म्हशीच्या पुतळ्याकडे जातो आणि तिला ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ असं म्हणतो. हे पाहून सारा चिडते आणि तिथेच मागून येऊन त्याला लाथ मारते.

सध्या या दोघांचा ही हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यांच्या चाहत्यांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहे. विकी कौशल आणि साराचा हा चित्रपट येत्या २ जूनला प्रदर्शित होत असून ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नुकताच साराने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये हजेरी लावली होती. या वर्षी तिने पहिल्यांदा फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. सध्या तिचे तेथील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT