Sanjeeda Shaikh On Her First Day Of Period While Shooting Mujra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjeeda Shaikh : संजीदा शेखने पीरियड्स दरम्यान केली होती 'हिरामंडी'ची शुटिंग, सांगितला शुटिंगचा किस्सा

Sanjeeda Shaikh Heeramandi Web Series : संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'हिरामंडी- द डायमंड बाझार' वेबसीरीज ओटीटीवरील लोकप्रिय सीरीज आहे. अभिनेत्री संजीदा शेखने मुलाखतीत शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.

Chetan Bodke

संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'हिरामंडी- द डायमंड बाझार' ही वेबसीरीज ओटीटीवर अजूनही तितकीच लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेली सीरीज आहे. ही वेबसीरीज प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. या वेबसीरीजच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी ओटीटी विश्वात डेब्यू केले आहे. नुकताच अभिनेत्री अभिनेत्री संजीदा शेख एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. शुटिंगच्या पहिल्याच दिवशी संजीदाला मासिक पाळी आली होती. आणि तिने त्याच दिवशी मुजरा सीन शूट केला होता. याबद्दलचा तिचा अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला आहे.

मुलाखतीत संजीदाने सांगितले, मी सेटवर मासिक पाळीबद्दल खूप मोकळ्या पद्धतीने बोलायचे. आणि अनेकदा मी मला मासिक पाळी येत असल्याचे दिग्दर्शकाला सांगायचे. याचं श्रेय संजीदाने तिच्या आईला दिलं. आणि म्हणाली, "माझ्या आईला जेव्हा मासिक पाळी यायची तेव्हा ती सर्वात आधी तिच्या वडिलांना सांगायची. त्यामुळे मलाही दिग्दर्शक, निर्माता किंवा सह-कलाकारांना मासिक पाळीबद्दल सांगायला काहीही वाटत नव्हतं. मला त्यांनी ही गोष्ट सांगताना अगदी सामान्य वाटायची."

पुढे शुटिंग दरम्यानचा किस्सा सांगताना संजीदाने सांगितले की, " वेबसीरीजच्या शुटिंगच्या पहिल्या दिवशी मला मासिक पाळी आली होती. त्याच दिवशी मला माझा पहिला मुजरा शूट करायचा होता. जेव्हा मासिक पाळीचा दुसरा दिवस असतो, तेव्हा खूप शारीरिक वेदना होतात, चिडचीड होते. पण मी शुटिंगमध्ये पूर्णपणे व्यस्त होते, त्यामुळे मला केव्हाच त्रास जाणवला नाही. मी दिग्दर्शकांना मासिक पाळीबद्दल सांगत असल्यामुळे ते त्या दिवसाचं शुटिंग पटापट संपवायचे. जर त्या काळात विश्रांती घेतली तर, मला दुसऱ्या दिवशी वाटेल, यासाठी मला ते विश्रांतीचाही सल्ला द्यायचे. त्यामुळे नेहमीच स्वत:ला व्यक्त करावं. होत असलेल्या गोष्टींचं कारण सांगितल्यामुळे आपल्याबद्दलचा विचार बदलतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT