Priyanka Chopra And Nick Jonas Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra ने निक जोनाससोबत देसी स्टाइलमध्ये साजरी केली होळी, डान्सचा VIDEO व्हायरल

Priyanka Chopra And Nick Jonas Video: प्रियंकाने पतीन निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत यावेळी देसी स्टाइलमध्ये होळी सेलिब्रेट करत खूप धम्माल केली. प्रियंकाचे होली सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Priyanka Chopra And Nick Jonas Dance Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत भारतामध्ये आली आहे. प्रियंकाने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत धुमधडाक्यामध्ये होळी साजरी केली. प्रियंकाने पतीन निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत यावेळी देसी स्टाइलमध्ये होळी सेलिब्रेट करत खूप धम्माल केली. प्रियंकाचे होली सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वत: प्रियंकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रियंकाने यावेळी निक जोनाससोबत जबरदस्त डान्स केला.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास आणि त्यांची मुलगी मालती मेरीने मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. त्यांच्या कुटुंबीयांनीही यंदा मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. प्रियांका चोप्राचा होळी साजरी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओमध्ये प्रियांका आणि निक जोनास होळीच्या गाण्यांवर एकत्र नाचताना दिसत आहेत. तर प्रियंकाची बहीण मन्नारा चोप्रा देखील डान्स करताना दिसत आहे.

प्रियंका चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियंकाची आई मधु चोप्रा, भाऊ सिद्धार्थ चोप्रा, चुलत बहीण मन्नारा चोप्रा हे देखील दिसत आहेत. यावेळी सर्वजण डान्स करत धम्माल करताना दिसत आहेत. प्रियंका, निक आणि मालती यांनी पांढऱ्या रंगाची ड्रेसिंग केलीये. तिघेही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत.

प्रियंका चोप्राच्या या पोस्टवरे कमेंट्स करत चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. त्याचसोबत तिघांच्या ही लूकचे कौतुक करत आहेत. प्रियंकाच्या या पोस्टला ९ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. प्रियंका चोप्राने निक जोनाससोबत जोधपूरमध्ये आलिशान पद्धतीने लग्न केले होते. हिंदू रितीरिवाजांनुसार आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. प्रियांका आणि निकच्या कुटुंबीयांनी मेहंदी आणि संगीत समारंभात खूप मजा केली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी झाली. 2017 मध्ये निक जोनास आणि प्रियांका मेट गाला या फॅशन इव्हेंटमध्ये भेटले होते. येथे त्यांनी Ralph Laurenची डिजाइन सादर केली होती. या कपलने 2018 मध्ये लग्न केले. निक जोनासने प्रियांका चोप्राच्या 'लव्ह अगेन' या चित्रपटात सेलीन डीओन आणि सॅम ह्यूघन यांच्यासोबत कॅमिओची भूमिका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर पुष्पवृष्टी करत आगळावेगळा निरोप

Blouse Sleeves Designs: ब्लाउज स्लीव्हजचे 'हे' फॅन्सी पॅटर्न नक्की ट्राय करा, साध्या साडीतही मिळेल ग्लॅमरस लूक

Terrorist Attack : लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला; १२ जवानांचा मृत्यू, पाकिस्तानात खळबळ

Nagpur Accident: स्कूल व्हॅन आणि बसच्या अपघातात विद्यार्थिनी आणि चालक ठार, नागपुरातील घटना|VIDEO

विदर्भात भाजपाला धक्का! बड्या नेत्यासह समर्थकांनी हाती बांधलं घड्याळ; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT