Parineeti Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

खरंच Parineeti Chopra प्रग्नेंट आहे का?, अभिनेत्रीने VIDEO शेअर करत सांगितलं सत्य

Parineeti Chopra Video: सध्या परिणीती आणि दिलजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटवेळी परिणीती चोप्राने कफ्तान ड्रेस घालला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या अफवा येऊ लागल्या.

Priya More

Parineeti Chopra Ends Pregnancy Rumours:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) तिच्या आगामी 'अमरसिंग चमकीला' (Amarsingh Chamkila) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत पंजाबी सिंगर आणि अभिनेता दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. दिलजीतने अमरसिंग चमकीला यांची भूमिका साकारली आहे. तर परिणीती चोप्राने त्याची पत्नी अमरजोत कौरची भूमिका साकारत आहे.

सध्या परिणीती आणि दिलजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटवेळी परिणीती चोप्राने कफ्तान ड्रेस घालला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या अफवा येऊ लागल्या. प्रेग्नेंसिच्या चर्चेदरम्यान (Parineeti Chopra Ends Pregnancy Rumours) आता परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

परिणीती चोप्राने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कफ्तान ड्रेस परिधान केला होता आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यासोबतच तिने प्रेग्नेंसी बातमी निव्वळ अफवा असल्याचेही स्पष्टपणे सांगितले आहे. परिणीती चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर सुंदर आणि फिट व्हाईट आउटफिट घातला आहे. यानंतर तिने तिच्या ब्लॅक कलरचा कफ्तान ड्रेसचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये तिने वेगवेगळ्या मीडिया साइट्सवर तिच्या प्रग्नेंसी बातम्यांचे कटिंग शेअर केले.

हा व्हिडिओ शेअर करताना परिणीती चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फिट कपड्यांच्या युगात प्रवेश करत आहे.' या व्हिडिओमध्ये परिणीतीने परिधान केलेला फिट आउटफिट हा पांढऱ्या रंगाचा पॅन्टसूट आहे. दोन दिवसांपूर्वी परिणीती चोप्राने प्रेग्नेंसीच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली होती. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले होते, 'काफ्तान ड्रेस = प्रेग्नेंसी, ओव्हरसाइज शर्ट = प्रेग्नेंसी, आरामदायक भारतीय कुर्ता = प्रेग्नेंसी.'

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी खुलासा केला होता की, 'त्याने परिणीती चोप्राला तिचे वजन 10 किलो वाढवण्यास सांगितले होते. इम्तियाज अली म्हणाले की, 'परिणिती म्हणाली की ती एक चित्रपट करण्यासाठी 5 वर्षांपासून वाट पाहत आहे ज्यामध्ये ती गाणं गाऊ शकते.' परिणीतीने चित्रपटासाठी होकार दिला. यानंतर आमच्या लक्षात आले की, परिणतीचा आकार अमरजोतसारखा नाही. मग मी म्हणालो - खूप सोपे काम आहे.', समोसे, मलाई, चाट... हे सर्व खाणे सुरू कर. मग तुझे वजन 10 किलो वाढेल. कोणतीही मुलगी हे करू शकत नाही आणि कोणताही मुलगा हे करू शकत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT