Parineeti-Raghav Wedding Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti-Raghav Wedding Photo: 'खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होते', लग्नाचे फोटो शेअर करत परिणीतीने केलेली खास पोस्ट चर्चेत

Parineeti Chopra First Post After Marriage: परिणीतच्या या पोस्टने साऱ्याचे लक्ष वेधले आहे. तिचे लग्नातील फोटो आणि तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Parineeti-Raghav Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) अखेर विवाहबंधनात अडकले. राघनीतीच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक होते. अखेर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. परिणीतीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर लग्नानंतरची पहिली पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये परिणीतीने लग्नातील राघवसोबतच्या खास क्षणांचे फोटो शेअर केले आहे. परिणीतच्या या पोस्टने साऱ्याचे लक्ष वेधले आहे. तिचे लग्नातील फोटो आणि तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच परिणीती आणि राघव यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर करत लग्नानंतरची पहिली पोस्ट शेअर केली आहे. दोघांनी एकत्रच ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये परिणीती आणि राघवने असे म्हटले आहे की, 'नाश्त्याच्या टेबलावर पहिल्याच गप्पा झाल्यापासून आमच्या मनाला कळालं होतं. खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो... म्हणून शेवटी मिस्टर आणि मिसेस होण्यात धन्यता मानली!' परिणीती आणि राघवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टला दोघांच्याही चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, या पोस्टमध्ये राघव आणि परिणीतीने त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो शेअर केले आहेत. नववधूच्या रुपामध्ये परिणीती एखाद्या परीपेक्षाही सुंदर दिसत आहे. तर राघव देखील नवरदेवाच्या रूपामध्ये खूपच हँडसम वाटत आहे. परिणीती पीच कलरचा लेहंगा परिधान केला आहे. तर राघवने शेरवानी परिधान केली आहे. दोघांनीही एकसारख्या रंगाचीच ड्रेसिंग स्टाईल केल्याचे दिसत आहे. एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाला घालताना, सात फेरे घेताना, एकमेकांना मिठी मारतानाचे फोटो त्यांनी शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दोघेही खूपच क्यूट दिसत आहे.

अवघ्या ४५ मिनिटांमध्ये राघव आणि परिणीतीच्या या पोस्टला साडेपाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. त्याचे हे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे, बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर कमेंटस करत दोघांनाही भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीतीची बहीण प्रियंका चोप्रा लग्नाला आली नाही मात्र तिने या पोस्टवर कमेंट्स करत 'माझे आशीर्वाद कायम तुमच्यासोबत' अशी कमेंट केली आहे. तर वरुण धवन, आयुष्मान खुराना, अनुपम खेर, नीना गुप्ता, मनिष मल्होत्रा, हरभजन सिंग, नेहा धुपिया, आदित्य ठाकरे यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सातवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

Politics: महायुतीत धुसफूस! भाजपकडून शिंदेंच्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; फोडाफोडीचं राजकारण सुरू

Operation Mahadev : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Shingnapur News : शनी शिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT